...म्हणून आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश अवश्य करावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 05:52 PM2018-07-05T17:52:26+5:302018-07-06T11:41:24+5:30

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुद्धा म्हटले जाते. भेंडीची बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते.

health benefits of ladys finger | ...म्हणून आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश अवश्य करावा!

...म्हणून आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश अवश्य करावा!

Next

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुद्धा म्हटले जाते. भेंडीची बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. भेंडीच्या भाजीचे अनेक पदार्थ खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये भेंडी मसाला, भेंडी फ्राय आणि भेंडी पुलावचा प्रामुख्याने समावेश होतो. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी लाभदायक आहे. भेंडीचे हे आरोग्यदायी फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच तिचा आहारात समावेश कराल...

- वजन कमी करण्यासाठी भेंडी अत्यंत उपयुक्त आहे. भेंडीमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे ती खाल्याने वजन वाढत नाही.

- भेंडिमध्ये पेक्टिन नावाचे सोल्युबव फायबर भरपूर असते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा धोका टाळता येतो. तसेच या भाजीत पॉलिफिनोलसारखे ऍण्टीऑक्सिडंटही खूप असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.

- भेंडिमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. 

- भेंडीमधील फायबरमुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व शरिराती साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असल्याने ती इन्सुलिनचा स्राव वाढवते.

- भेंडिमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींमध्ये वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होतात. तसेच भेंडीमध्ये असलेल्या सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.

Web Title: health benefits of ladys finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.