जेवणात 'या' एका खास गोष्टीचा करा समावेश, कधीच होणार नाही अॅसिडिटी आणि गॅस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:41 AM2024-01-09T11:41:30+5:302024-01-09T11:41:56+5:30
आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अनेकदा जेवण केल्यावर अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ लागतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चुकीची लाइफस्टाईल, भूकेपेक्षा जास्त जेवण करणे, स्पायसी किंवा फ्राइड फूडचं सेवन, वेळेवर जेवण न करणं, जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं इत्यादी.
आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी एका पदार्थाबाबत सांगितलं आहे जो तुम्ही रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये टाकला तर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.
डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी गॅस, पोट फुगणं, अॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून वाचण्यासाठी एक चिमुटभर हींग जेवण बनवताना त्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही अनेकदा हींगाचा वापर सुगंध आणि फ्लेवरसाठी केला असेल, पण याच्या फायद्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल.
हींग आरोग्यासाठी फायदेशीर
हींग कसा आपल्या गट हेल्थचा फायदा पोहोचोवतो याबाबत डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी सांगितलं की, हींग एक अॅंटी-गॅस एजेंट असतो, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या होत नाही.
डॉक्टर म्हणाल्या की, ज्या लोकांना नेहमीच गॅसची समस्या राहते त्यांनी जेवणात हींगाचा वापर करायला हवा. इतकंच नाही तर त्या म्हणाल्या की, हींग पोटातील जंतूच्या समस्येपासूनही सुटका मिळवून देतो. यामागे त्यांनी हींगात असलेल्या एंथेलमिंटिक प्रॉपर्टीज प्रभावी सांगितलं.
हींग हा नॅचलर कार्मिनेटिवच्या रूपात काम करतो. हेच कारण आहे की, याने पोटातील सूजपासून ते पोट फुगणे व पचनासंबंधी अनेक समस्या दूर होतात.
हींगाचे काही इतर फायदे
खाण्यात हींगाचा समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच हार्ट हेल्थलाही बराच सपोर्ट मिळतो. एका रिसर्च याला मासिक पाळीत होणारी वेदना दूर करण्यासाठीही फायदेशीर मानलं आहे. हींगामध्ये अॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात जे डोकेदुखी व सूज येण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.