'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये आलू बुखारा, जाणून घ्या नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:11 PM2024-07-22T13:11:22+5:302024-07-22T13:12:03+5:30
Plum health benefits : या लेखात आपण या फळाचे काय काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात हेच जाणून घेणार आहोत.
Plum health benefits : पावसाळ्यात वेगवेगळी फळं बाजारात मिळतात. या दिवसात बरेच लोक आवडीने आलू बुखारा हे फळ खातात. आंबट-गोड लागणारं हे फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीरही असतं. पण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. या फळामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सीडेंट, पॉलीफेनोल आणि कॅरोटीनॉयड तत्व असतात. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याने शुगर कंट्रोल होते, हाडे मजबूत होतात, वजन कंट्रोल होतं, तसेच याचे गर्भावस्थेतही अनेक फायदे होतात. पण सोबतच काही लोकांना या फळामुळे नुकसानही होऊ शकतात. अशात आज या लेखात आपण या फळाचे काय काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात हेच जाणून घेणार आहोत.
आलू बुखाराचे नुकसान
बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्या लोकांना आलू बुखारा खाल्ल्याने पोट फुगण्याची, अपचन आणि गॅसची समस्या होण्याचा धोका असतो. तसेच याने पचनासंबंधी समस्याही होऊ शकते.
ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या आहे त्यांनी आलू बुखारा अजिबात खाऊ नये. कारण हे फळ खाल्ल्याने एलर्जीची समस्या होऊ शकते.
आलू बुखारा खाण्याचे फायदे
- आलू बुखाऱ्यामध्ये भरपूर लिपिट आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे मिळतात.
- या फळाचा वापर हदी, लस्सी आणि आइसक्रीम सारख्या पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.
- वाळलेल्या आलू बुखाऱ्याचा वापर तुम्ही स्नॅक्स, ज्यूस, जेली पावडर आणि जॅम बनवण्यासाठी करू शकता.
- ताज्या आलू बुखाऱ्यामध्ये सेरोटोनिन हे तत्व असतं. जे एक न्यूरोट्रांसमीटर आहे जे चिंता दूर करतं. तसेच नियोफोबिया कमी करण्यास मदत करतं.
- आलू बुखाऱ्याचं सेवन केल्याने इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत मिळते. याने हृदयरोगाचा धोका टाळता येतो.