सरळऐवजी उलटं धावून स्वत:ला ठेवा फीट, जाणून घ्या बॅकवर्ड रनिंगचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:10 PM2022-12-08T15:10:35+5:302022-12-08T15:12:22+5:30
आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल?
Backward Running Benefits : आजच्या बिझी लाइफमध्ये सगळेच आपली हेल्थ आणि वेलनेस मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. अशात कुणी योगा क्लासेस जॉइन करतात तर कुणी फिटनेससाठी एरोबिक्स करतात. पण फिटनेससाठी सगळ्यात फेमस पद्धत म्हणजे रनिंग. रनिंग वेटलॉससाठी सगळ्यात चांगली मानली जाते.
आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? चला जाणून घेऊ बॅकवर्ड रनिंग काय आहे.
काय आहे बॅकवर्ड रनिंग?
एव्हरी डे हेल्थनुसार, बॅकवर्ड रनिंगमध्ये फॉरवर्ड रनिंगने मसल्सची वेगळी मुव्हमेंट होते. बॅकवर्ड रनिंगमध्ये नॉर्मल पेक्षाही जास्त कोऑर्डिनेशनची गरज असते. त्यामुळे मेंदूवरही चांगली प्रभाव पडतो.
बॅकवर्ड रनिंगचे फायदे
एक्सपर्ट्सनुसार बॅकवर्ड रनिंगने एथलीट्समध्येही बरेच बदल बघण्यात आले आहेत. जेव्हा बऱ्याच महिन्यांपासून फॉरवर्ड रनिंग करत असलेल्या एथलिट्सला बॅकवर्ड रनिंग करण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्यांचे रनिंग पॅटर्न बदलला आणि आधीपेक्षा चांगला झाला. काही रिसर्चेसनुसार, बॅकवर्ड रनिंगने फॉरवर्ड रनिंगच्या तुलनेत जास्त वजन कमी झालं.
कुणी करावी बॅकवर्ड रनिंग?
असे कोणतेही व्यक्ती ज्यांच्या गुडघ्यात वेदना आहेत आणि ते रिकव्हरी मोडवर आहेत ते बॅकवर्ड रनिंगच्या माध्यमातून आपले गुडघे आधीपेक्षा जास्त मजूबत करू शकता. अशाप्रकारे रनिंग करून त्यांना फायदा मिळू शकतो. पण असं करण्याआधी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.