हिवाळ्यात रोज प्या हे खास पाणी, कफ, सर्दी अन् खोकला लगेच होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:54 AM2023-11-23T09:54:09+5:302023-11-23T09:54:50+5:30

Turmeric water Benefits :हे पाणी पिऊन इम्यूनिटी मजबूत होईल. कारण हळद गरम असते जी तुम्हाला आतून गरम ठेवते. चला जाणून घेऊ हे पाणी पिण्याचे फायदे...

Health benefits of drinking turmeric water daily in winter | हिवाळ्यात रोज प्या हे खास पाणी, कफ, सर्दी अन् खोकला लगेच होईल दूर

हिवाळ्यात रोज प्या हे खास पाणी, कफ, सर्दी अन् खोकला लगेच होईल दूर

Turmeric water Benefits :  थंडीला सुरूवात होताच वेगवेगळे आजार लोकांना शिकार करू लागतात. अशात इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण काही गोष्टींमुळे तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान पोहोचतं. अशात तुम्हालाही हिवाळ्यात कफ, खोकल्याने हैराण केलं असेल तर रोज हळदीचं पाणी सेवन करा. हे पाणी पिऊन इम्यूनिटी मजबूत होईल. कारण हळद गरम असते जी तुम्हाला आतून गरम ठेवते. चला जाणून घेऊ हे पाणी पिण्याचे फायदे...

हळदीचं पाणी पिण्याचे फायदे

खोकला- कफ दूर करण्यास फायदेशीर

हळदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. याचं सेवन केल्याने तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. हळदीमध्ये कफ नष्ट करण्याचे गुण असतात. तसेच याने इम्यूनिटी बूस्ट होते ज्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा धोकाही कमी राहतो.

पचनतंत्र होतं चांगलं

हळदीमध्ये फायबर असतं जे पचनासंबंधी समस्या दूर करण्याचं काम करतं. हिवाळ्यात अनेकदा बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या होते. त्यामुळे तुम्ही रोज हळदीचं पाणी प्यावं. असं केल्याने पोटासंबंधी अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल.

इम्यूनिटी होईल स्ट्रॉग

हळदीमध्ये असे तत्व असतात जे इम्यूनिटी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वातावरणात होणाऱ्या आजारांपासूनही बचाव होतो. अशात जर हिवाळ्यात तुम्हाला ताप किंवा अंगदुखीची समस्या असेल तर हळदीच्या पाण्याचं सेवन करा.

वजन कमी करण्यास मदत

हिवाळ्यात वजन कमी करणं सगळ्यात अवघड मानलं जातं. पण जर तुम्ही हिवाळ्यात रोज एक ग्लास हळदीच्या पाण्याचं सेवन कराल तर याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. कारण यात मेटाबॉलिज्म बूस्ट करणारे तत्व असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात.

(टीप - या लेखातील टिप्स या सामान्य माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. पण सगळ्यांना याचा फायदा होईल असं नाही. त्यामुळे हा उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)
 

Web Title: Health benefits of drinking turmeric water daily in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.