Health tips: रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:25 PM2022-03-15T18:25:30+5:302022-03-15T19:40:49+5:30

तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

health benefits of drinking water from copper vessel on empty stomach | Health tips: रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी

Health tips: रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी

googlenewsNext

निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता दोन ग्लास पाणी पिण्याचा (Drinking Water) सल्ला दिला जातो. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी (Water in a copper pot) पिणं फायदेशीर असल्याचे मानले जाते. यामुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष संतुलित राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, तांबे हे निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. जे लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.

पाणी स्वच्छ होते
तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. सायन्सनुसार, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करते.

सांधे-गुडघेदुखीवर फायदेशीर 
सांधे किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे. कारण, तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात वेदना निर्माण करणारी इंफ्लामेशन कमी करण्यात मदत करतात आणि सांधे आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त
शरीरात चालू असलेल्या चरबीच्या चयापचयासाठी तांबे खूप महत्त्वाचे आहे. तांब्याचा वापर चरबीच्या पेशी तोडण्यासाठी आणि त्यांचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यावं.

मेंदूसाठी निरोगी
मेंदूसाठी तांबे खूप महत्त्वाचे आहे. कारण, तांबे मेंदूमध्ये उपस्थित न्यूरोट्रांसमीटर नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही पार्किन्सन्स, अल्झायमरसारख्या मेंदूच्या आजारांपासून दूर राहतोच, पण स्मरणशक्तीही मजबूत होते.

Web Title: health benefits of drinking water from copper vessel on empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.