डार्क चाकलेट खाण्याचा स्वत: डॉक्टरही देतात सल्ला, शरीराला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:39 AM2024-05-21T09:39:56+5:302024-05-21T09:41:43+5:30

Dark Chocolate Benefiits : डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असतं आणि शुगर कमी असते. 

Health benefits of eating a small piece of dark chocolate | डार्क चाकलेट खाण्याचा स्वत: डॉक्टरही देतात सल्ला, शरीराला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

डार्क चाकलेट खाण्याचा स्वत: डॉक्टरही देतात सल्ला, शरीराला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

Dark Chocolate Benefiits : डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतात. यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्सही असतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, डार्क चॉकलेटमुळे आरोग्य चांगलं राहू शकतं आणि हृदयरोगाचा धोकाही कमी करू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे फायदे सांगणार आहोत. यात 11 ग्रॅम फायबर, 66 टक्के आयर्न, 57 टक्के मॅग्नेशिअम, 196 टक्के तांबे आणि 85 टक्के मॅगनीजसारखे पोषक तत्व असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असतं आणि शुगर कमी असते. 

डार्क चॉकलेटचे फायदे

डार्क चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगासंबंधी अनेक धोके कमी होतात. जसे की, हाय कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो. याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या बायोअॅक्टिव तत्वामुळे त्वचेला फायदा मिळत. यात फ्लेवनॉल्स सूर्यकिरणांपासून त्वचेची रक्षा करतात. त्वचेमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच त्वचा टाइटआणि हायड्रेट राहते.

तणाव कमी होतो

डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यास मदत करतं. याचं सेवन केल्याने तुमचा मूड चांगला राहतो. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे तत्व तणाव निर्माण करणारा हार्मोन कॉर्टिसोल नियंत्रित करतं.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीस असतानाही चॉकलेट खाणं हे जरा तुम्हाला प्रश्नात टाकू शकतं. पण अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात हे चॉकलेट खाल्लं तर या आजारात याने फायदा मिळतो. कारण यातील पोषक तत्व शरीरात ग्लूकोजला मेटाबॉलाइज करतात. इन्सुलिनबाबत तुमच्या शरीरात संवेदनशीलता सुधारते.

Web Title: Health benefits of eating a small piece of dark chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.