अळूवड्या आणि भाजी तर अनेकदा खाल्ली असेलच आता याचे फायदे जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:03 AM2024-06-05T10:03:44+5:302024-06-05T10:05:22+5:30
अनेक आजारांपासून या पानांमुळे बचाव होतो. यात शरीराला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात.
अळूच्या पानांची भाजी किंवा अळूवड्या खाणं भरपूर लोकांना आवडतं. ही भाजी आरोग्यासाठीही खूप चांगली असते. ही भाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अनेक आजारांपासून या पानांमुळे बचाव होतो. यात शरीराला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात.
अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. तसेच यात मॅग्नेशिअम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फोरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. इन्स्टावर एक व्हिडीओ nutribit.app नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात अळूच्या पानाचे आरोग्याला होणारे फायदे सांगण्यात आले आहेत.
अळूची पाने खाण्याचे फायदे
१) अळू पानांच्या सेवनाने शरीरातील शुगरची लेव्हल नियंत्रित राहते. याने शरीरात इन्सुलिन आणि ग्लूकोज रिलीज होतं. तसेच ग्लायसेमिक लेव्हलही योग्य राहते. ज्यामुळे डायबिटीस कमी होण्यास मदत होते.
२) अळूच्या पानामध्ये कॅलरी कमी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते. या पानांमुळे लठ्ठपणा आणखी वाढत नाही.
३) अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते. अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते.
४) अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.
कुणी खाणे टाळावे
१) अळूची पाने कच्ची खाल्ल्याने घशात जळजळ होऊ शकते.
२) दमा असलेल्या लोकांनी अळूची पाने सेवन करू नयेत.
३) ज्या लोकांना गुडघा दुखणे आणि खोकल्याची समस्या उद्भवते. त्यांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे.
४) ज्या लोकांना गॅसची समस्या आहे. अशांनी अळूची पाने खाणे टाळावे.