मध आणि काळी मिरी एकत्र खाऊन शरीराला मिळतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:25 AM2024-11-18T10:25:27+5:302024-11-18T10:30:45+5:30
काळी मिरी आणि मध मिक्स करून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. काळी मिरी आणि मधाचे शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
Honey kali mirch health benefits : भारतीय किचनमध्ये काळी मिरी सहजपणे मिळणारा मसाला आहे. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्यामुळे याला आयुर्वेदातही फार महत्व आहे. अशात काळी मिरी आणि मध मिक्स करून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. काळी मिरी आणि मधाचे शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
मध आणि काळी मिरीचे फायदे
पचन तंत्र मजबूत होतं
मध आणि काळी मिरीच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत होण्यास मदत मिळते आणि सोबतच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. काळी मिरीमधील अॅंटी-ट्यूसिव आणि अॅंटी-अस्थेमेटिक गुणांमुळे खोकल्याची समस्या दूर होते. तसेच श्वासासंबंधी समस्यांपासूनही बचाव होतो.
गॅस, अॅसिडिटी होईल दूर
मध आणि काळी मिरीच्या मिश्रणाने पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होण्यासही मदत मिळते. मधाने पचन तंत्र चांगलं राहतं. तसेच दोन्हीच्या मिश्रणाने इम्यूनिटीही बूस्ट होते.
चेहऱ्याची चमक वाढते
या गोष्टी दोन्ही एकत्र सेवन केल्याने चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत मिळते. तसेच याने चेहरा मुलायमही होतो. इतकंच नाही तर पोट साफ होऊन शरीरातील विषारी पदार्थही बाहेर काढले जातात.
तणाव होईल कमी
मधात अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-मायक्रोबिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तर काळी मिरीमध्ये अॅंटी-डिप्रेसेंट गुण असतात. ज्यामुळे तुमची चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.