सकाळी रिकाम्या पोटी खजूर का खावेत? जाणून घ्या चार फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:35 AM2023-08-18T09:35:14+5:302023-08-18T09:37:50+5:30

Benefits of Dates In The Morning: तुम्हाला हे माहीत आहे का की, हे गोड फळ रोज सकाळी खाल्लं तर याने काय फायदा मिळतो? चला जाणून घेऊ फायदे...

Health benefits of eating dates in morning empty stomach | सकाळी रिकाम्या पोटी खजूर का खावेत? जाणून घ्या चार फायदे

सकाळी रिकाम्या पोटी खजूर का खावेत? जाणून घ्या चार फायदे

googlenewsNext

Benefits of Eating Dates Empty Stomach: सगळ्यांनाच हे माहीत आहे की, खजूर खाणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं. खजुरामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे शरीरासाठी चांगले असतात. यात फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी6 आणि आयरन भरपूर प्रमाणात असतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, हे गोड फळ रोज सकाळी खाल्लं तर याने काय फायदा मिळतो? चला जाणून घेऊ फायदे...

1) वजन होईल कमी

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.

2) वाढेल एनर्जी

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढते. तसेच तुमच्या भरपूर एनर्जी राहते.

3) डायजेशन होईल मजबूत

ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

4) गोड खाण्याची ईच्छा कमी होते

बरेच लोक असे असतात जे गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. पण त्यांच्या या सवयीमुळे लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका वाढतो. अशात खजूर बेस्ट पर्याय ठरू शकतो. याने जास्त गोड खाण्याची क्रेविंग कमी होते. सोबतच जास्त गोड खाण्यापासूनही वाचता.

Web Title: Health benefits of eating dates in morning empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.