लसणाच्या पाण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, रोज प्याल तर दूर होतील अनेक आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:31 PM2022-09-21T16:31:54+5:302022-09-21T16:32:08+5:30
Garlic Water Health Benefits: लसणाचं पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जर लसणाचं रोज एक ग्लास पाणी प्यायलात तर तुम्ही अनेक समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
Garlic Water Health Benefits: लसूण फारच फायदेशीर मसाला आहे. त्यात अनेक औषधी गुण आहेत. अनेक आजार दूर करण्यास त्याची मदत होते. तसा तर लसणाचा वापर जास्तीत जास्त लोक भाजीत किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करतात. पण बऱ्याच लोकांना याचे औषधी गुण माहीत नसतात. लसणाचं पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जर लसणाचं रोज एक ग्लास पाणी प्यायलात तर तुम्ही अनेक समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
लसणाचे गुण
लसणामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-वायरल गुण असतात. याने अनेक आजारांपासून बचाव होतो. लसणामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. यात व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 सारखे पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात मॅग्नीज, कॅल्शिअम आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असतं.
पोटाच्या आजारावर फायदेशीर
लसणाचे पोटासाठी अनेक फायदे होतात आणि लसणाचं पाणी पोटाच्या अनेक समस्या दूर करतं. लसणामुळे पोटदुखी, गॅस, सूज, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून सुटका मिळते. जर कुणाला पचनासंबंधी काही समस्या झाली असेल तर त्यांनी रोज सकाळी लसणाचं पाणी प्यायला हवं. लसणाचं पाणी प्यायल्याने मासिक पाळी दरम्यान होणारी वेदनाही दूर होते.
हार्टसाठी फायदेशीर
लसणातील तत्व रक्त पातळ करतात. याने ब्लड फ्लो चांगल्याप्रकारे होतो. हृदयाच्या अनेक समस्यांमुळे रक्त घट्ट होणं किंवा रक्त गोठणं अशा समस्या होतात. लसणाचं पाणी प्यायल्याने रक्त पातळ राहतं आणि हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. यात एलिसिन नावाचं तत्व आढळतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. पण हृदयरोगांमध्ये डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो.
इम्यूनिटी वाढते
लसणामुळे इम्यूनिटी मजबूत करतो. यात अॅंटी फंगल, अॅंटी-व्हायरल आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे आजारांसोबत लढण्यास मदत करतात. लसणाचं पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.
कधी आणि कसं प्यावं?
दोन ग्लास पाण्यात लसणाच्या दोन ते तीन कळ्या टाकून चांगलं उकडून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत ते उकडा. अशाप्रकारे लसणाचे सगळे पोषक तत्व पाण्यात उतरतील. टेस्टसाठी या पाण्यात काळे मिरे आणि काळं मीठ टाकून पिऊ शकता. हे पौष्टिक पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणं जास्त फायदेशीर आहे. हे पाणी तुम्ही नाश्ता किंवा जेवणासोबतही पिऊ शकता.