'या' पाच आजारांवर रामबाण उपाय आहे ही वनस्पती, वाचाल तर लगेच सुरू कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:14 PM2023-06-06T13:14:45+5:302023-06-06T13:15:14+5:30

Health Benefits Of Kalmegh : याबाबत जास्तीत जास्त लोकांना काहीच माहिती नाही. अशात आज आम्ही तुम्हाला या वनस्पतीचे फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही आजच याचं झाड घरात लावाल.

Health benefits of kalmegh green chiretta ayurvesic herb body pain, indigestion, liver infection, cancer | 'या' पाच आजारांवर रामबाण उपाय आहे ही वनस्पती, वाचाल तर लगेच सुरू कराल सेवन!

'या' पाच आजारांवर रामबाण उपाय आहे ही वनस्पती, वाचाल तर लगेच सुरू कराल सेवन!

googlenewsNext

Health Benefits Of Kalmegh : आयुर्वेदात आरोग्यासाठी अनेक खास उपाय आहेत. पण अनेकांना त्यांची माहितीच नसते. तुम्ही काळमेघ या वनस्पतीचं नाव ऐकलं असेलच. ही एक अशी जडीबुटी आहे. ज्याचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. पण याबाबत जास्तीत जास्त लोकांना काहीच माहिती नाही. अशात आज आम्ही तुम्हाला या वनस्पतीचे फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही आजच याचं झाड घरात लावाल.

1) अंगदुखी

अनेकदा आपल्याला इतकी अंगदुखी होते की, ती सहनही होणं अवघड असतं. आराम करूनही त्यापासून सुटका मिळत नाही. अशात तुम्ही काळमेघचं सेवन करू शकता. कारण यात एनाल्जेसिक तत्व आढळतात. याने सूज आणि आयरनची कमतरता दूर होते. याने तुमची अंगदुखी लगेच दूर होते.

2) इनडायजेशन

भारतात तेलकट आणि जंक फूड खाण्याचं चलन जास्त आहे. अशात पचन तंत्र बिघडतं, बद्धकोष्ठतेची समस्या आणि गॅसच समस्या होऊ लागते. जर तुम्हाला यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही काळमेघचं सेवन करू शकता.

3) लिव्हर डिजीज

लिव्हर आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. जो शरीरातील वेगवेगळ्या क्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. हेच कारण आहे की, या अवयवाची काळजी घेणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही नियमितपणे काळमेघचं सेवन कराल तर लिव्हर डिजीजचा धोका फार कमी होऊ शकतो.

4) इन्फेक्शन

काळमेघमध्ये अॅंटी-बायोटिक तत्व आढळतात. जे आपल्या अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवतात. अशात ताप, फ्लू किंवा इतर दुसरे सीजनल डिजीजपासून बचाव होतो. सोबतच गळ्याच्या इन्फेक्शनमध्येही काळमेघ फार फायदेशीर ठरते.

5) कॅन्सर

कॅन्सर एक फार भयावह आणि जीवघेणा आजार आहे. जर तुम्हाला याची माहिती सुरूवातीला मिळाली नाही तर तुमचा जीवही जाऊ शकतो. जर तुम्ही काळमेघ वनस्पतीचं सेवन केलं तर या आजाराचा धोका कमी होऊ लागतो.

Web Title: Health benefits of kalmegh green chiretta ayurvesic herb body pain, indigestion, liver infection, cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.