करवंद खाल्ले तर खूप असतील, पण तुम्हाला याचे फायदे माहीत नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:12 AM2024-07-20T10:12:03+5:302024-07-20T10:12:52+5:30
Karwand Benefits : इम्यूनिटी वाढवण्यासाठी करवंद तुमची मदत करू शकतं. तसेच हे फळं खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून तेच फायदे....
Karwand Benefits : पावसाळा आला की, करवंद खाण्याची चांगलीच मजा असते. हे रानटी फळ आपल्या आंबट चवीसाठी खूप लोकप्रिय आहे. पिकलेले करवंद गोड लागतात. पावसाळा आला की, इम्यूनिटी कमजोर होते ज्यामुळे वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या दिवसात इम्यूनिटी मजबूत करणं फार गरजेचं असतं. अशात इम्यूनिटी वाढवण्यासाठी करवंद तुमची मदत करू शकतं. तसेच हे फळं खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून तेच फायदे....
करवंदाचे फायदे
- करवंदामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याचं सेवन थेट, लोणच्याच्या रूपात, ज्यूसच्या रूपात किंवा चटणीच्या रूपात केलं जातं.
- करवंदामध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
- गर्भवती महिलांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानलं जातं. कारण याने आयर्नचं अवशोषण वाढतं. ज्यामुळे एनीमियापासूनही बचाव होतो.
- करवंदामधील व्हिटॅमिन सी कॉलेजन बनवण्यास मदत करतं. ज्याने केस आणि त्वचेला खूप फायदा मिळतो. तसेच याने कोशिकांचा विकासही होतो आणि त्यात रिपेअरही होतात.
- व्हिटॅमिन सी मुळे इन्फ्लेमेशनपासून बचाव होतो आणि इम्यूनिटी वाढते.
- डायरिया झाला असेल तर करवंद खाणं खूप फायदेशीर ठरतं.
- करवंद खाऊन रक्त शुद्ध होतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
- करवंदामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच इतरही अनेक पोषक तत्व असतात. जसे की, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए इत्यादी पोषक तत्व असतात.
- अॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे करवंद यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून बचाव करतं.
- आठवड्यातून दोन ते तीन दिवस करवंद खाणं चांगलं असतं. करवंद जास्त खाणं नुकसानकारकही ठरू शकतं.