Summer health tips: अ‍ॅसिडीटीला दूर करतं का मटक्यातलं पाणी? जाणून घ्या काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:53 PM2022-04-18T15:53:52+5:302022-04-18T15:57:28+5:30

तुम्हाला माहितीये का मडक्यातील पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.

health benefits of matka or mud vessel water in summer | Summer health tips: अ‍ॅसिडीटीला दूर करतं का मटक्यातलं पाणी? जाणून घ्या काय आहे सत्य...

Summer health tips: अ‍ॅसिडीटीला दूर करतं का मटक्यातलं पाणी? जाणून घ्या काय आहे सत्य...

googlenewsNext

जुन्या काळातील व्यक्ती मातीच्या मडक्यातून पाणी पित असतं. मात्र आता फ्रिजपुढे मडक्याच्या पाण्याची चव अनेकांच्या जीभेवरून दूर गेली आहे. आता काही क्वचित लोकांच्या घरी मातीची मडकी दिसून येतात. मात्र तुम्हाला माहितीये का मडक्यातील पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.

घसा खवखवत नाही
फ्रीजमधील पाणी फार थंड असतं आणि बाहेर ठेवलेलं पाणी गरम. मात्र मातीच्या मडक्यातील पाणी जास्त थंडही नसतं की जास्त गरमंही नसतं. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य असतं. खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीही मडक्यातील पाण्याचं सेवन करू शकतात. 

मेटाबॉलिझम बूस्ट करते
जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो तेव्हा त्यामध्ये बिस्फेनॉल A तसंच बीपीए यांसारखे विषारी घटक असतात. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळीही कमी होते. मात्र मडक्यातील पाण्याच्या सेवनाने टेस्टोस्टेरोनचा स्तर संतुलित राहतो आणि मेटाबॉलिझम उत्तम राहतं. 

अ‍ॅसिडीटीपासून आराम
मानवी शरीराची प्रकृती अ‍ॅसिडीक असते आणि माती एल्कालाइन असते. त्यामुळे मडक्याचं पाणी आपल्या शरीराची अ‍ॅसिडीक प्रकृतीसोबत रिएक्ट करतं. हेच कारण आहे ज्यामुळे मडक्यातील पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडीटी आणि पोटाच्या समस्यापासून आराम मिळतो.

Web Title: health benefits of matka or mud vessel water in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.