रोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 01:47 PM2022-09-08T13:47:43+5:302022-09-08T13:48:16+5:30
Moong dal sprouts : रोज सकाळी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचाल, तर रोज या मूगाचं सेवन कराल. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
Moong dal sprouts : मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात.
मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.
1) ब्लड ग्लूकोज होतात कमी
मोड आलेले मूग खाल्यास शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच याने ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहतं. याने डायबिटीजची समस्या कमी करण्यास मदत होते.
2) रोगप्रतिकारशक्ती वाढते
मूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी वाढते. याने वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती वाढते. यातील अॅंटीमायक्रोबियल आणि अॅंटीइंफलामेंट्री गुण असतात ज्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
3) पचनक्रिया चांगली राहण्यास मदत
मोड अलेल्या मूगामध्ये शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य कमी होतात. यासोबतच पचनक्रिया नेहमी चांगली राहते. तसेच पोटासंबंधी आजारही कमी होतात.
4) त्वचेवर येतो ग्लो
मूगामध्ये सायट्रोजन असतात जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.
5) पोटदुखीपासून आराम
मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं. याने पोटाने विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत.