रोज भाजलेले चणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेक आजारांवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:58 AM2022-06-27T09:58:09+5:302022-06-27T10:18:39+5:30

फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही. आज आपण फुटण्याच्या काही फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

health benefits of roasted chana | रोज भाजलेले चणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेक आजारांवर रामबाण

रोज भाजलेले चणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेक आजारांवर रामबाण

googlenewsNext

फुटाणे म्हणजेच रोस्टेड ग्राम (Roasted Gram) साधारणपणे लोक स्नॅक्सच्या स्वरूपात खातात. मात्र या फुटण्याचे अनेक आरोग्यवर्धक (Health Benefits Of Roasted Gram) फायदे आहेत. फुटण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही. आज आपण फुटण्याच्या काही फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
फुटाण्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे अनेकदा वजन कमी करण्यासाठी फुटाणे खाण्याचा सल्ला दिला (Roasted Gram Helps To Loose Weight) जातो. वजन कमी करण्यासाठी फुटण्याचा आहारात समावेश केला जातो. त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. फुटण्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय फुटाणे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयासाठीही ते फायदेशीर आहे.

पचनशक्ती मजबूत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते
फुटाण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात (Roasted Gram Strengthens Digestive System And Boosts Immunity). यामुळे पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. फुटाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीदेखील आढळतात. त्यामुळे फुटण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांना प्रतिबंध होतो.

मधुमेहींसाठी फायदेशीर
फुटाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. म्हणजे यामुळे रक्तातील साखर अधिक वाढत नाही. यामुळेच मधुमेहींना फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो (Roasted Grams Are Good For Diabetics). त्याचबरोबर ताप आल्यावरही फुटाणे खाणे फायदेशीर ठरते.

Web Title: health benefits of roasted chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.