भाजलेलं जिरं खाल्ल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:02 AM2024-07-01T10:02:10+5:302024-07-01T10:03:12+5:30
Jeera ke fayade : जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्व असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
Jeera ke fayade : जिऱ्याचा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. अनेक पदार्थ जिऱ्याशिवाय बनवलेच जात नाहीत. जिऱ्याने टेस्ट चांगली होते. सोबतच जिऱ्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. जिऱ्याने पचनक्रिया चांगली होते आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. भाजलेलं जिरं वजन कमी करण्यास मदत करतं, ब्लड शुगर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतं. अशात जिऱ्याचे आणखी काय फायदे होतात ते जाणून घेऊ...
जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्व असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
भाजलेलं जिरं खाण्याचे फायदे
- जिऱ्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. जिरं पोटातील चरबी आणि काही पोषक तत्व पचवण्यास मदत करतं.
- एक चमचा जिरे पावडरमध्ये १.४ मिली ग्रॅम आयर्न असतं. आयर्नची कमतरता सगळ्यात कॉमन पोषक तत्वांच्या कमतरतेपैकी एक आहे. ज्याने जगातील २० टक्के लोकसंख्या प्रभावित आहे. तर श्रीमंत देशांमध्ये एक हजार लोकांपैकी दहा लोक याने प्रभावित आहेत.
- जिऱ्यामधील अनेक तत्व हे अॅंटी-ऑक्सिडेंट्सच्या रूपात काम करतात. ज्यांनी शरीरासाठी घातक फ्री रॅडिकल्स नष्ट होतात.
- भाजलेलं जिरं डाबिटीसमध्येही फायदेशीर ठरतं. ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
- जिऱ्यामुळे शरीरात वाढलेली सूज कमी होते. तसेच त्वचेलाही फायदे होतात. पिंपल्स, पुरळ येत नाही. तसेच फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
- जिऱ्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. दिवसा जिऱ्याच्या पाण्याने चेहरा धुतल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो.
जिऱ्याचं पाणीही फायदेशीर
एका भाड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये दोन चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून चांगले उकळून घ्या. यानंतर हे पाणी कपात घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेल्यास फायदेशीर ठरेल.
आणखी एक पद्धत
झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका. हे पाणी रात्रभर असंच ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी पिण्यासाठी जिरे गाळून घ्या. पाण्याचं सेवन करा आणि नंतर जिरे चाऊन खाऊ शकता.