भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क, लगेच प्यायला लागाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:39 AM2023-07-22T09:39:46+5:302023-07-22T09:42:56+5:30

Soaked Raisins : मनुके आणि त्याच्या पाण्याने केवळ काही दिवसात लिव्हर स्वच्छ केलं जाऊ शकतं. चला जाणून घेऊ लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

Health benefits of soaked raisins you should know | भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क, लगेच प्यायला लागाल!

भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क, लगेच प्यायला लागाल!

googlenewsNext

Soaked Raisins : आजकालच्या जीवनातील वेगवेगळ्या चुकांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होताना दिसतात. लोक आपल्याच चुकांमुळे अनेक गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. सतत तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही.  अशात शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. मनुके आणि त्याच्या पाण्याने केवळ काही दिवसात लिव्हर स्वच्छ केलं जाऊ शकतं. चला जाणून घेऊ लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. मनुके एनर्जी असलेलं एक लो फॅट फूड आहे. ज्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेकप्रकारचे फायदे होतात.

कसं करावं तयार?

हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ कप पाणी घ्या आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे १५० ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. २ कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. २० मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.

कसं आणि कधी करावं सेवन?

सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ ३ दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

काय आहेत याचे फायदे?

1) मनुक्याच्या पाण्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो.

2) या पाण्यात अमिनो अ‍ॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.

3) मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते.

4) तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देतं.

5) मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात.

Web Title: Health benefits of soaked raisins you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.