Health tips: 'या' फळाची साल फेकुन देण्याची चूक करु नका, आहेत इतके फायदे की फळ सोडुन सालच खात रहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 05:00 PM2022-04-17T17:00:41+5:302022-04-17T17:02:39+5:30
त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची सालं फेकून देत असाल तर आधी हे वाचा. या सालींचं तुम्ही लोणचं किंवा टुटी-फ्रुटी बनवू शकता.
आजवर तुम्ही टरबूज खाण्याचे फायदे वाचले असतील. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की टरबुजाच्या सालींमध्येही खूप पोषकत्त्व असतात. (health tips) यात अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह लायकोपिन, सिटूललाईन क्लोरोफिल आणि फेनॉलिकसारखी पोषकतत्व असतात. त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची सालं फेकून देत असाल तर आधी हे वाचा. या सालींचं तुम्ही लोणचं किंवा टुटी-फ्रुटी बनवू शकता. (watermelon peels uses)
रोगप्रतिकारशक्ती वाढते
टरबुजाच्या साली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदतीच्या ठरतात. यात खूप प्रमाणात की जीवनसत्व असतं. हे रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत ठेवतं. सोबतच हे पांढऱ्या पेशींच्या निर्मितीलाही प्रोत्साहन देतं. यातून शरीरात संसर्ग होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. (what are the benefits of watermelon peel)
रक्तदाबावर नियंत्रण राहतं
टरबुजाच्या साली खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत मिळते. तुम्हालाही रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर या मोसमात टरबुजाच्या साली नक्की खा. (why to eat watermelon peel)
बद्धकोष्ठता दूर होते
बद्धकोष्ठता दार करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. यात खूप फायबर असतं. (eating watermelon peel uses)
रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं
टरबुजाच्या साली खाल्ल्यानं रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. तुम्हाला असं वाटत असेल, की तुमच्या रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल योग्य रहावं, तर या उन्हाळ्यात तुम्हीही टरबुजाची सालं नक्की खा.
ऊर्जा वाढते
टरबुजाची सालं खाल्ल्यानं ऊर्जा वाढते. या सालींमध्ये सिटूललाईन अमिनो ऍसिड असतं. हे मांसपेशींना ऑक्सिजन पुरवतं. यातून शरीराला ऊर्जा मिळते. वर्कआउट करण्यातही मदत मिळते.
वजन कमी होतं
वजन कमी करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. साली खाल्ल्यानं फॅट बर्न होतं. सालींमधील सिटूललाईन अमिनो ऍसिड यासाठी मदत करतं.