मिठाई म्हणूननही खाल्ली जाणारी 'ही' भाजी ठेवते नियंत्रणात शुगर, कॉलेस्ट्रॉल अन् वजनही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:15 PM2021-08-13T13:15:37+5:302021-08-13T13:16:36+5:30
परवल या भाजीचं नावच कमी जणांनी ऐकलं असेल त्यामुळे या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पण, याची भाजी आणि मिठाईसुद्धा करता येते.
फळं, कडधान्य, भाज्याआरोग्यासाठी अतिशय फायदे आहेत. त्यामुळेच तर, त्यांचा आहारामध्ये समावेश (Included in Diet) असतोच. भाज्या, पालेभाज्या लोक आवडीने खातात. पण, काही भाज्या त्यांच्या चवीमुळे (Taste) खाणं टाळलं जातं. कारलं, वांग, शेपू अशा भाज्या पोटासाठी उत्तम असल्या तरी सर्वांनाचं आवडतात असं नाही. त्यातलीच एक भाजी आहे परवल (Parval). परवल या भाजीचं नावच कमी जणांनी ऐकलं असेल त्यामुळे या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पण, याची भाजी आणि मिठाईसुद्धा करता येते.
परवल आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर (Health Benefits) आहे. याला कोवाक्काई,थोंडाकाई,पोटोल आणि परोरा या नावानेही ओळखलं जातं. आरोग्यासाठी परवल खाण्याचे किती फायदे (Health Benefits Of Parval) आहेत हे जाणून घेऊयात. हे फायदे माहिती झाले तर, आहारात ही भाजी समाविष्ट करालच.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं
कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करण्यासाठी परवल मदत करतं. परवलमध्ये हायपरलिपिडेमिक गुणधर्म आहेत ज्यामुळे परवल कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतं. LDL म्हणजे खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड म्हणजेच रक्तातील चरबी कमी करण्याचं काम करतं. तसेच HDL म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करत.
रक्त शुद्ध करतं
शरीराचं रोगांपासून संरक्ष करण्यासाठी रक्त शुध्दीकरण आवश्यक आहे आणि रक्त शुद्ध करणारे गुण परवलमध्ये असतात. यामुळे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. ज्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी (Weight Loss)करण्यासाठी परवल चांगली भूमिका बजावू शकतं. यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे वजन कमी करण्यासाठी परवल फायदेशीर आहे.