जांभळ्या बटाट्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:28 AM2018-12-31T11:28:13+5:302018-12-31T11:36:40+5:30
बटाट्याची भाजी आपल्यापैकी अनेकांची फेवरेट भाजी असावी. दैनंदिन आहारातील ही एक महत्त्वाची आणि अनेकांना आवडणारी भाजी आहे.
बटाट्याची भाजी आपल्यापैकी अनेकांची फेवरेट भाजी असावी. दैनंदिन आहारातील ही एक महत्त्वाची आणि अनेकांना आवडणारी भाजी आहे. बटाट्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते. बटाट्याचे पराठेही चांगलेच ल्रोकप्रिय आहेत. पण कधी तुम्ही जांबळ्या रंगाच्या बटाट्याची भाजी खाल्ली का? नाही ना? होय..जांभळ्या रंगाचा बटाटा. या जांभळ्या रंगाच्या बटाट्याचे अनेक फायदे असतात. असं म्हणतात की, ज्या लोकांना तारुण्य टिकवून ठेवायचंय आणि सुंदर दिसायचंय त्यांनी या बटाट्याचं सेवन करावं. दिसायला हा बटाटा रताळ्यासारखा दिसतो, पण याची चव सामान्य बटाट्याची असते.
जांभळ्या रंगाचा बटाटा हा जंगली बटाटा आणि सामान्य बटाट्याच्या तत्वांना एकत्र करुन तयार करण्यात आला आहे. या बटाट्यावर अनेक शोधही करण्यात आले. चला जाणून घेऊ या बटाट्याचे फायदे.
सामान्य बटाट्याच्या तुलनेत या बटाट्यामध्ये अरारोटचं(एक तत्व) प्रमाण कमी असतं. त्यामुळेच याचा रंग जांभळा असतो. पण खाल्ल्यावर मात्र चव सामान्य बटाटच्या प्रमाणेच असते. जांभळ्या रंगाचा हा बटाटा जंगली बटाटा आणि सामान्य बटाट्यापासून तयार करण्यात आला आहे. शिजवल्यानंतरही या बटाट्याचा रंद चमकदार आणि जांभळाच राहतो.
कॅन्सरला ठेवतो दूर
तज्ज्ञांनुसार, जांभळ्या रंगाच्या बटाट्यासोबतच रंगीत झाडांमध्ये बायोगॅक्टिक तत्व असतात. जसे की, एंथोकायनिन आणि फिनोलिक अॅसिड जे कॅन्सरच्या उपचारासाठी फायदेशीर असतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, या तत्वांचं मोलेक्युलर स्तरावर काम करणे कॅन्सरला रोखण्यासाठीचं पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
अॅंटी-एजिंग गुण
जांभळ्या रंगाच्या या बटाट्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतं. जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढून त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या दूर करतं. याने त्वचा आणखी तजेलदार आणि टवटवीत होते. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर होत असल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसून येत नाहीत.
कुठे आढळतो हा बटाटा?
जांभळ्या रंगाच्या या बटाट्यांची साल जवळपास काळ्या रंगाची असते. तर आतील भाग हा गर्ग निळा आणि जांभळा असतो. शिजवल्यावरही या बटाट्या जांभळा रंग कायम राहतो. हे बटाटे प्रामुख्याने फ्रान्समध्ये आढळतात. सामान्य बटाट्याच्या तुलनेत या बटाट्याची वाढ उशीरा होते.