पोट साफ होण्यासोबतच अनेक आजारांसाठी फायदेशीर 'डाग' असलेली केळी, जाणून घ्या कशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:59 PM2020-01-19T12:59:34+5:302020-01-19T13:01:39+5:30

आरोग्याच्या अनेक समस्या महिला  आणि पुरूषांना जाणवत असतात.

Health Benefits of spotted banana | पोट साफ होण्यासोबतच अनेक आजारांसाठी फायदेशीर 'डाग' असलेली केळी, जाणून घ्या कशी

पोट साफ होण्यासोबतच अनेक आजारांसाठी फायदेशीर 'डाग' असलेली केळी, जाणून घ्या कशी

Next

आरोग्याच्या अनेक समस्या महिला  आणि पुरूषांना जाणवत असतात. कारण  बदलती जीवनशैली आणि  दिवसेंदिवस  कामामुळे भासणारी वेळेची  कमतरता यामुळे  समस्या उद्भवत असतात. आरोग्याच्या समस्या उद्भवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आहार घेण्याच्या चुकिच्या पद्धती. पण तुम्हाला माहित आहे का रोजच्या वापरात असलेल्या काही घटकांचा वापर करून तुम्ही आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकता.

Image result for spotted banana

केळ्याचं  सेवन करण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. दररोज एक केळी खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. व्हिटॅमिन, प्रोटिन आणि इतर पोषक तत्त्वांनी भरलेले हे फळ आहे.  जे लोकं व्यायाम करतात. ते रोज केळ्याचं सेवन करतात. कारण शरीराला उर्जा मिळण्यासाठी केळ्याचं सेवन उत्तम ठरतं. पण तुम्हाला हे माहीत आहे  का साधं केळ्याचं सेवन करण्यापेक्षा जर तुम्ही डाग असलेल्या केळ्याचा आहारात समावेश केला तर अधिक फायदेशीर ठरतं असतं. चला तर मग जाणून घ्या डाग असलेल्या केळ्याच्या सेवनाने शरीराला कोणते फायदे मिळतात.

Image result for spotted banana
रक्तदाबाच्या समस्या दुर होतात 

Image result for blood pressure

तुमचा विश्वास बसणार नाही पण काळे डाग असलेल्या केळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. डाग असलेल्या केळ्यांमध्ये  पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते तसंच  सोडीयमचे प्रमाण कमी असते. सोडीयमचे प्रमाण कमी असल्यामुळे डाग असलेली केळी खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

अ‍ॅसिडिटीवर गुणकारक

Image result for acidity

डाग असलेले केळं अन्नावर प्रक्रिया करायला मदत करते किंवा अन्न खाली ढकलायला मदत करते . अ‍ॅसिडिटीमध्ये तुमच्या पोटात अनेक गॅसेस तयार झालेले असतात. काहींना अ‍ॅसिडीटी झाली की, करपट ठेकर येऊ लागतात. अशावेळी जर तुम्ही एखादं  डाग असलें केळं खाल्लं तरी तुम्हाला आराम पडू शकतो. 

अन्न पचनासाठी फायदेशीर  

Image result for digestion

सध्याच्या काळात अनियमीत जीवनशैलीमुळे अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या जाणवते.  त्यामुळे शरीराच्या विविध भागातून एलर्जीमार्फत विषारी पदार्थ बाहेर पडायला सुरुवात होते.  डाग असलेल्या केळ्यामध्ये फायबर्स असतात.  विेशेषतः त्यात पेक्टीन नावाचे फायबर असते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेदना कमी होतात

Image result for menstrual pain

डाग असलेल्या केळ्यांमध्ये व्हिटामीन  बी 6 आणि पोटॅशियम असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.  डाग असलेली केळी खाल्यामुळे मासिक पाळीतील वेदना सुद्धा कमी होतात.  त्यामुळे मासिकपाळीत अंगदुखीमुळे होणारी चिडचिड कमी होते. 

ताण- तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर

Image result for stress face(image credit-goop)

डाग असलेल्या केळ्यांमध्ये मेंदूवर ताण- तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतात.  त्यामुळे  डाग असलेले केळी खाल्यामुळे  मुड चांगला राहून मानसीक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. 

Web Title: Health Benefits of spotted banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.