बेलफळाचा ज्यूस उन्हाळ्यात ठरतो वरदान; शरीराला थंडावा देण्यासोबतच इतरही फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:49 PM2019-05-06T13:49:29+5:302019-05-06T13:52:30+5:30
उन्हाळ्यामध्ये वाढत्या उन्हामुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. अशातच वातावरणातील उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करण्यात येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या आणि आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या पेय पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
(Image Credit : BookBaak)
उन्हाळ्यामध्ये वाढत्या उन्हामुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. अशातच वातावरणातील उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करण्यात येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या आणि आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या पेय पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ऊन आणि सनस्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी बेलफळाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. बेलफळामध्ये प्रोटीन, बीटा-कॅरोटीन, थायमीन,रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सी आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतं.
थंडावा देण्यासाठी
बेलफळाचा ज्यूस पिणं उन्हाळ्यामध्ये अत्यंत लाभदायी ठरतं. यामध्ये आढळणारी तत्व उन्हापासून बचाव करून शरीराला थंडावा देतात. याव्यतिरिक्त सनस्ट्रोकपासूनही बचाव होतो.
पोटाचे आरोग्य राखण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये अनेकदा पोटाच्या समस्येचा सामना करावा लागतो. गॅस, बद्धकोष्ट, अपचन यांसारख्या समस्यांनी अगदी हैराण व्हायला होतं. या समस्यांमध्ये बेलफळाचा ज्यूस फायदेशीर ठरतो. बेलफळामध्ये असलेली पोषक तत्व आरोग्यासोबतच पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच माउथ अल्सरच्या समस्या दूर करण्यासाठीही बेलफळाचा ज्यूस मदत करतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलफळाचा ज्यूस अत्यंत परिणामकारक ठरतो. तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. बेलफळामधील पोषक तत्व रक्त शुद्ध करण्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठीही मदत करतात.
हृदयासाठी फायदेशीर
बेलफळाच्या ज्यूसमध्ये थोडसं तूप एकत्र करून प्यायल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. हा पेय पदार्थ नियमितपणे प्यायल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बेलफळाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं.
बाळंतीणींसाठी ठरतं लाभदायक
बाळंतीणींसाठी बेलफळाचा ज्यूस पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त बेलफळाचा ज्यूस ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन वाढविण्यासाठी मदत करतं. जे नवजात बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी
बेलफळाचा ज्यूस त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरतं. बेलफळाचा ज्यूस कोमट गरम करून प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.