पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:24 AM2020-01-21T10:24:13+5:302020-01-21T10:24:38+5:30
वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरराची वाढलेली चरबी कमी करण्यासासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.
वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरराची वाढलेली चरबी कमी करण्यासासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण सध्याच्या काळात पुरूष असो अथवा महिला सगळ्यांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो जर तुम्हाला सुद्धा वजन वाढण्याची समस्या उद्भवत असेल किंवा शरीर बेढब दिसत असेल तर निराश व्हायचं काही कारण नाही. कारण अनेकदा वजन कमी होत नाही किंवा आपली फिगर आकर्षक दिसत नाही म्हणून लोकांची मानसीक स्थिती खूप तणावाखाली असते.
कोणत्याही प्रकारे वजन कमी करण्यासाठी पैसे न घालवता तसंच जीमला न जाता तुम्ही घरच्याघरी काही योगासनं करून आपलं वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी आणि कोणच्या प्रकारची योगासन केल्यानंतर तुम्ही सुडौल आणि सुंदर दिसाल.
शरीराला आकर्षक करण्यासाठी भुजंगासान
भुजंगासन केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.( हे पण वाचा-पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
कमरेचा आकार कमी करण्यासाठी उष्ट्रासन
उष्ट्रासन करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा.किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. हे आसन केल्याने कंबरेचा आणि पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी नौकासन
सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता. ( हे पण वाचा-'सुपर डाएट' फॉलो केल्याने प्रत्येक आठवड्यात १ किलो वजन झटपट होईल कमी, मग बघा कमाल.... )