स्वतःच्या पायावर 'उभं' राहून काम करायला शिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:37 AM2018-07-09T11:37:54+5:302018-07-09T11:38:41+5:30
तुम्ही तासंतास एकाच जागी बसून काम करता का? दिवसभर संगणकासमोर बसल्यावर एखाददोन वेळेच तुम्ही जागेवरुन उठत असाल तर तुम्ही मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहात हे नक्की. कामाची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी एकाच जागी ठिय्या देऊन बसणे उत्तम आरोग्याची डेडलाइन संपविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
मुंबई- तुम्ही तासंतास एकाच जागी बसून काम करता का? दिवसभर संगणकासमोर बसल्यावर एखाददोन वेळेच तुम्ही जागेवरुन उठत असाल तर तुम्ही मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहात हे नक्की. कामाची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी एकाच जागी ठिय्या देऊन बसणे उत्तम आरोग्याची डेडलाइन संपविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
सतत बसून राहिल्यामुळे तुम्ही अत्यंत कमी कॅलरी वापरता त्यामुळे शरीरात मेद साठण्याचे प्रमाण वाढते. मधुमेह, हृदयरोग व अकारण वाढलेले वजन हे याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आजकाल बसून काम करणाऱ्या लोकांच्या कॅलरींचे ज्वलन व्हावे यासाठी स्टॅडिंग डेस्कचा पर्याय सूचवला जातो. स्टॅडिंग डेस्कमुळे कॅलरी अधिक खर्च केल्या जातता व मेद साठण्याचे प्रमाण कमी होऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात. या डेस्कमुळे उभे राहून काम करता येते व आपल्या उंचीनुसार ते सेट करता येत असल्यामुळे मान, पाठ यांना कोणताही त्रास होत नाही.
१) स्टॅडिंग डेस्कमुळे, बसून काम करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कॅलरी खर्च होतात, वजन कमी करण्यासाठी या पर्यायाचा वापर केला जातो.
२) सतत बसून काम करणाऱ्या लोकांना मान व पाठदुखीचा त्रास सुरु होतो. मात्र उभे राहून काम करणाऱ्या लोकांच्या पाठदुखीचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासात आढळले आहे.
३) बसून काम करण्यापेक्षा उभे राहून काम करणाऱ्या लोकांचे काम कमी कंटाळवाणे असल्याचे, नवे प्रयोग केल्याचा आनंद घेत करता येणारे असते.
४) रोजच्या कामात तुम्ही थोडावेळ उभं राहून काम करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या सवयींमध्ये थोडा बदल होऊ शकतो.
५) स्वतः उठून पाणी घेणे, एखादी वस्तू स्वतः उठून आणणे अशा लहान सवयींपासून हे बदल स्वीकारता येतील.