आरोग्य शिबिरास जनसागर उसळला महाआरोग्य शिबिर: पहिल्याच दिवशी हजारो रुग्णांनी घेतला लाभ
By admin | Published: January 9, 2016 11:23 PM2016-01-09T23:23:55+5:302016-01-09T23:23:55+5:30
जळगाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले.
Next
ज गाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास शनिवारी सकाळी १० वाजेपासूनच प्रारंभ झाला. जिल्ातील कानाकोपर्यातून नागरिक या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले होते. विविध कक्षांसमोर लागल्या रांगाशिबिरस्थळी असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय कक्षासमोर सर्वाधिक रांगा होत्या. या परिसरात महिला व पुरुषांचे डोळे तपासणे व चष्मे वाटप, कॅन्सर रुग्णांची तपासणी केली जात होती. डोळ्यांचे विकाराचे हजारो रुग्ण रांगा लावून या कक्षाच्या बाहेर उभे होते. यात महिलांच्या व पुरुषांच्या रांगा वेगळ्या होत्या. उपाध्याय कक्षाच्या आतून निघालेली रांग बाहेर संपूर्ण मंडपाला वेढा देऊन पुढे जात होती. जवळपास पंधरा ते वीस तपासणी कक्ष या ठिकाणी होते. -------लहाने, महात्मेंचा पुढाकारडोळे तपासणीच्या या कक्षात डॉ. तात्याराव लहाने, त्यांचे जे.जे. रुग्णालयातील २० ते २५ सहकारी, नागपूर येथील महात्मे आय बॅँक, आय हॉस्पिटलचे डॉ. विकास महात्मे हे स्वत: रुग्णांची तपासणी करून उपचार तसेच ऑपरेशनबाबत माहिती देताना दिसत होते. याच परिसरात कॅन्सर पीडितांसाठीही दोन कक्ष होते. औरंगाबाद व मुंबईतील नायर, जेे.जे. सायन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ या ठिकाणी तपासणी करताना दिसत होते. ----लहान बालकांसह माता,पिता रांगेतलहान मुलांच्या विविध विकारांची तपासणी करून घेण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी कक्षासमोर मोठ्या रांगा होेत्या. पुणे येथील बी.जे. महाविद्यालयातील डॉक्टरांचे एक खास पथक डॉ. संध्या खडसे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिर स्थळी आले होते. लहान, लहान मुलांच्या विकारांवर तज्ज्ञ सल्ला या ठिकाणी देण्यात येत होता. ऑपरशनची गरज असल्यास त्याप्रमाणे सल्ला दिला जात होता. ------ट्रक भरून येत होती औषधीरुग्णांना मोफत औषधी या ठिकाणी देण्यात येत होती. त्यासाठी मुंबईहून काही ट्रक भरून औषधी या ठिकाणी उतरविण्यात आली. औषधींचे खास कक्ष स्थापन करण्यात आले होते. मागणीनुसार दिनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, डॉ. अब्दुल कलाम कक्षांकडे औषधी पुरविली जात होती. -----