​Health : पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे कर्करोगाला आमंत्रण !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2017 09:04 AM2017-06-03T09:04:36+5:302017-06-03T14:34:36+5:30

संशोधनानुसार शरीरातील ज्या भागावर चरबी वाढते त्यासंबंधीत कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

Health: Cancer due to excess fat on the stomach! | ​Health : पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे कर्करोगाला आमंत्रण !

​Health : पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे कर्करोगाला आमंत्रण !

googlenewsNext
रांन्समध्ये इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर (आयएआरसी-डब्ल्यूएचओ) मधील शास्त्रज्ञ आणि संशोधनाचे मुख्य लेखक हींज फ्रीसलिंग यांनी केलेल्या संशोधनानुसार शरीरातील ज्या भागावर चरबी वाढते त्यासंबंधीत कर्करोग होण्याचा धोका वाढतो. 
उच्च बॉडी मांस इंडेक्स (बीएमआय) व्यतिरिक्त पोटावर वाढलेली चरबी कर्करोगाला आमंत्रण देते असेही त्यांनी आपल्या निष्कर्षात म्हटले आहे. विशेषत: अतिरिक्त चरबीचा धोका वृध्दांना जास्त आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. धूम्रपानानंतर अतिरिक्त वजन हे कर्करोगाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून वेळीच काळजी घेऊन हा धोका टाळू शकता. 
कमरेवर चरबीची प्रति ११ सेंटीमीटर वाढ लठ्ठपणाशी संबंधीत कर्करोग होण्याचा धोका १३ टक्क्यांनी वाढवते. यामध्ये स्तन, आतड्याचा, गर्भाशय, अन्ननलिका, अन्नाशय, गुद्वार, यकृत, ह्रदय, पित्ताशय, ओवरी, घशाचा इत्यादी प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे.
याशिवाय कमरेवर ८ सेंटीमीटर चरबीची वाढ आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढवते.

Also Read : ​HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !

Web Title: Health: Cancer due to excess fat on the stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.