छातीत इन्फेक्शन झालं तर शरीर देतं काही संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 03:14 PM2022-08-06T15:14:34+5:302022-08-06T15:15:08+5:30
Chest Infection Syptoms: छातीत इन्फेक्शन झालं तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. चला जाणून घेऊ छातीत इन्फेक्शन झाल्यावर शरीर कोणकोणते संकेत देतं.
Chest Infection Syptoms: बऱ्याच लोकांना छातीत वेदना होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. असं होण्याचं कारण म्हणजे अनेकदा गॅस किंवा छातीत इन्फेक्शनमुळेही छातीत वेदना होतात. छातीत इन्फेक्शन होणं फार कॉमन आहे. बदलत्या वातावरणामुळे ही समस्या जास्त बघायला मिळते. कधी कधी छातीचं इन्फेक्शन हलकं असतं जे 7 ते 10 दिवसात बरं होतं. पण कधी कधी हे इन्फेक्शन इतकं गंभीर होतं की, याने तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अशात याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. छातीत इन्फेक्शन झालं तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. चला जाणून घेऊ छातीत इन्फेक्शन झाल्यावर शरीर कोणकोणते संकेत देतं.
खोकला - छातीत इन्फेक्शन झालं तर सतत आणि खूप जास्त खोकला येतो. काही केसेसमध्ये खोकल्यासोबत पिवळा कफही बाहेर निघतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त काळापासून कफ असलेला खोकला होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
श्वास घेण्यास त्रास - छातीत इन्फेक्शन झालं की, श्वासांची गती प्रभावित होते. इन्फेक्शन झाल्यावर तुम्हाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. जर श्वास घेण्यास थोडाही त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
छातीत वेदना - तसे तर छातीत वेदना होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण छातीत इन्फेक्शन हेही याचं कारण असू शकतं. छातीत इन्फेक्शन झालं तर छातीत जोरात वेदना होऊ शकते.
डोकेदुखी - डोकेदुखीचीही वेगवेगळी कारणे असू शकतात. छातीत वेदना होत असेल तर हेच डोकेदुखीचं कारण ठरू शकते. जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून डोकेदुखीची समस्या असेल तर याकडे दुर्लक्ष न करता चेकअप करावं.