सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होते? अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:55 PM2022-07-27T17:55:15+5:302022-07-27T17:55:32+5:30

Headache in the Morning: यामागे काहीना काही कारण असू शकतं. जसे की, तणाव, पाण्याची कमतरता इत्यादी. अशात तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचं कारण सांगत आहोत. 

Health care tips reason for headache in the morning | सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होते? अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कारण...

सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होते? अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Headache in the Morning: सकाळी झोपेतून उठल्यावर बऱ्याच लोकांना डोकेदुखीची समस्या होते, पण बरेच लोक ही समस्या सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही समस्या सामान्य नाहीये. यामागे काहीना काही कारण असू शकतं. जसे की, तणाव, पाण्याची कमतरता इत्यादी. अशात तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचं कारण सांगत आहोत. 

रक्ताची कमतरता

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्हाला झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होऊ शकते. तसेच डोकेदुखीसोबतच कमजोरी आणि चक्कर येणं शरीरात ऑक्सीजनची कमतरता असल्याचा संकेतही असू शकतो.

शुगर लेव्हल 

जर तुमच्या शरीरात शुगर असामान्य असेल तर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची लक्षणं दिसू शकतात. मॉर्निंग सिकनेसचं एक लक्षण डोकेदुखीही आहे. पण जर तुम्हाला रोज सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होत असेल तर तुम्ही तुमची शुगर लेव्हल चेक केली पाहिजे.

पाण्याची कमतरता

जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते. भरपूर प्रमाणात पाणी न प्यायल्याने तुम्हाला सकाळी उठून डोकेदुखीची समस्या नेहमी होऊ शकते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे.

स्लीप डिसऑर्डर

स्लीप डिसऑर्डरमुळेही सकाळी उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते. तेच अनेक लोकांमध्ये तणावामुळेही डोकेदुखीची समस्या होऊ शकते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

काय करावा उपाय?

सकाळी उठल्यावर डोकेदुखी होत असेल तर लिंबू पाण्याचं सेवन करा. थंड पाण्याऐवजी नॉर्मल पाण्यात लिंबाचा रस टाकून सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

Web Title: Health care tips reason for headache in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.