​Health : हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी ‘चॉकलेट’ उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 01:35 PM2017-05-25T13:35:21+5:302017-05-25T19:05:21+5:30

दात किडतील म्हणून बऱ्याचदा चॉकलेट खाऊ नये असे सांगितले जाते, मात्र नवीन संशोधनानुसार हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

Health: 'Chocolate' is useful for heart health! | ​Health : हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी ‘चॉकलेट’ उपयुक्त !

​Health : हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी ‘चॉकलेट’ उपयुक्त !

Next
त किडतील म्हणून बऱ्याचदा चॉकलेट खाऊ नये असे सांगितले जाते, मात्र नवीन संशोधनानुसार हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल - हार्ट या वैद्यकीय अहवालानुसार एका विशिष्ट प्रमाणात सेवन केलेलं चॉकलेट तुमच्या हृदयाला तंदुरुस्त ठेवतं.  एवढेच नव्हे तर स्ट्रोक येणं, विस्मरण, हृदयक्रिया बंद पडणं अशा आजारांसाठी चॉकलेट वरदान ठरत आहे.
या संशोधनात ५० ते ६४ वयोगटातल्या ५५ हजार लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यांच्या आहारात एका विशिष्ट प्रमाणात केलेला चॉकलेटचा समावेश त्यांच्या हृदयासाठी लाभदायक ठरल्याचे यातून स्पष्ट झाले. मात्र, चॉकलेटचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरात चरबी आणि साखर वाढवते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हृदयाला तरुण ठेवायचं असेल, तर एका विशिष्ट प्रमाणात चॉकलेट खाण्याचा सल्ला संशोधनातून देण्यात आला आहे. 

Also Read : ​Heart Attack : दुर्लक्ष करु नका अशा दुखण्याकडे !
                    HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !

Web Title: Health: 'Chocolate' is useful for heart health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.