रंगांचं हेल्थ कनेक्शन : जाणून घ्या कोणत्या रंगाचा शरीरावर कसा पडतो प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 10:24 AM2018-10-11T10:24:00+5:302018-10-11T10:34:57+5:30
रंगांशिवाय आपलं जीवन अर्धवट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे अर्थताच रंगाचा आपल्या मूडचं आणि आरोग्याचं कनेक्शन असावं.
रंगांशिवाय आपलं जीवन अर्धवट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे अर्थताच रंगाचा आपल्या मूडचं आणि आरोग्याचं कनेक्शन असावं. लाल, हिरवा, निळा, पिवळा असे सर्वच रंग आपल्या व्यवहारासोबतच आपल्या आरोग्यावरही प्रभाव टाकतात. चला जाणून घेऊ कोणते रंग आपल्या शरीरावर कसा प्रभाव करतात...
ऊर्जेशी संबंधित आहे लाल रंग
लाल रंग अधिक पाहिल्याने तणाव जाणवतो. हा रंग राग आणि फ्रस्ट्रेशन वाढवतो. श्वास आणि हृदयाचे ठोके वाढवतो. लाल रंग हा ऊर्जेशी संबंधित मानला जातो. हा रंग शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवतो. तसेच लाल रंग ब्लड प्रेशरही वाढवतो.
मेटाबॉलिज्म वाढवतो पिवळा रंग
पिवळ्या रंगाने शरीरात सेरोटॉनिन स्त्राव अधिक होतो. त्यामुळे याने मन आनंदी होतं. पिवळा रंग अधिक वेळ पाहिल्याने थकवा दूर होतो. तसेच या रंगाने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं. असं निरीक्षण आहे की, लहान मुले पिवळा रंग असलेल्या रुममध्ये अधिक रडतात. पिवळा रंग आनंदी भावनांना ताजं करतं.
सेक्शुअल अॅक्टिव्हिटी वाढवतं पर्पल(जांभळा) रंग
जांभळा म्हणजेच पर्पल रंग सेक्शुअल अॅक्टिव्हिटी वाढवतो. तसेच हा रंग निराशाची भावना अधिक वाढवतो. हा रंग फ्रस्ट्रेशनचं कारण ठरतो.
अस्थिरता वाढवतो ग्रे रंग
ग्रे म्हणजेच राखाडी रंग हा अस्थिरता वाढवतो. तसेच हा रंग अपेक्षा निर्माण करतो.
मनाला शांत करतो निळा रंग
निळा रंग मनुष्याच्या मेंदुवर आरामदायक प्रभाव करतो. शरीरातील मेटाबॉलिज्मची गती कमी करतो. तसेच हा रंग मनाला शांत करतो. निळा रंग जास्त वेळ पाहिल्याने डिप्रेशन येतं असं मानलं जातं.
तणाव कमी करतो हिरवा रंग
हिरव्या रंगाचा डोळ्यांवर चांगला प्रभाव होतो. याने शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो. हिरव्या रंगाने डोळे चांगले राहतात. हा रंग हीलिंग आणि हायजेनिक प्रभाव करतो.
रूची वाढवतो केशरी रंग
केशरी रंग हा मानसिक क्षमता वाढवतो. तसेच हा रंग रूची वाढवतो. त्यासोबतच हा रंग मानसिक हालचालींचा वेग वाढवतो.
राग कमी करतो गुलाबी रंग
गुलाबी हा रंग तसा सर्वांच्याच आवडीचा. हा रंग चांगलाच प्रभाव करतो. गुलाबी रंग राग आणि तणाव कमी करतो. तसेच हा रंग स्त्रियांचे गुणही दर्शवतो.
डोकं शांत करतो पांढरा रंग
पांढरा रंग हा शांतीचं प्रतिक आहे. त्यामुळे हा रंग आपल्या मनावर प्रभाव टाकतो. हा रंग एका यशस्वी सुरुवातीचं प्रतिनिधीत्व करतो.
दृष्टीकोनाची भावना वाढतो काळा रंग
काळा रंग हा एक दृष्टीकोनाची भावना वाढवतो. इतकेच नाही तर काळा रंगाचे कपडे परिधान केल्याने लोक बारीक दिसतात.