​HEALTH : टाइट जीन्स आणि हाय हील्समुळे होतो गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 06:58 AM2017-07-20T06:58:25+5:302017-07-20T12:28:25+5:30

आपणही टाइट जीन्स आणि हाय हील्स वापरत असाल तर आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.

HEALTH: Cure illness caused by tight jeans and high heels! | ​HEALTH : टाइट जीन्स आणि हाय हील्समुळे होतो गंभीर आजार !

​HEALTH : टाइट जीन्स आणि हाय हील्समुळे होतो गंभीर आजार !

Next
लत्या जीवनशैलीनुसार फॅशनचा ट्रेंडही बदलत आहे. बहुतांश चित्रपटात सेलेब्स टाइट जीन्स आणि हाय हील्स परिधान करताना दिसतात. सिनेसृष्टीतील तारकांचे हेच अनुकरण करुन आजची तरुणाई स्लिम आणि फिट राहणे पसंत करते. विशेष म्हणजे सैल आणि खुले कपड्यांना ते आऊट आॅफ फॅशन समजतात आणि टाइट जीन्स, टाइट वन पीस आणि हाय हील्सला अ‍ॅडव्हॉन्स फॅशन समजतात. आपली फिगर जर व्यवस्थित असेल तर आपणास असे ड्रेसेस कॉम्प्लीमेंटदेखील करतात. मात्र आपणास माहित आहे का, की टाइट कपडे आणि हाय हील्स परिधान केल्याने आपणास कित्येक गंभीर आजार होऊ शकतात.  

टाइट कपडे आणि हाय हील्सपासून होणारे आजार  
टाइट कपडे परिधान केल्याने आपल्या शरीरात यीस्ट इंफेक्शन होत असते, ज्यामुळे शरीरात वेदना, खाज, जळजळ आदी समस्या निर्माण होतात आणि वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर त्वचा रोगास आमंत्रण दिले जाते. ही समस्या विशेषत: शरीराच्या ज्या भागात घाम येतो अशा ठिकाणी निर्माण होते.  
टाइट जीन्स परिधान केल्याने आपल्या पोटावर प्रेशर पडू शकतो, ज्यामुळे आपणास तिव्र पोटदुखी होऊ शकते. शिवाय यामुळे पाचनक्रिया असंतुलित होऊन अ‍ॅसिडिटी किंवा पोटात जळजळ निर्माण होऊ शकते. 
हाय हील्स परिधान केल्याने आपल्या लोअर बॅकवर प्रेशर पडतो यामुळे पाठदुखीच्या समस्येने आपण ग्रस्त होऊ शकतो. शिवाय हील्स परिधान केल्याने आपणास जॉइंट पेन आणि गाठीदेखील होऊ शकतात. वेळीच लक्ष दिले नाही विविध समस्या निर्माण होऊन आपल्या शरीरात गंभीर आजारांची लक्षणे जाणवू शकतात.  

Also Read : जीन्स खरेदी करताना अशी घ्या काळजी !   
                   : ​​स्टायलीश जीन्सची क्रेझ वाढतेय...

Web Title: HEALTH: Cure illness caused by tight jeans and high heels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.