HEALTH : पचनक्रिया बिघडलीय? तर घ्या हे ५ सूप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 09:40 AM2017-02-17T09:40:49+5:302017-02-17T15:10:49+5:30

आज प्रत्येकाचे आयुष्य घाईचे झाले आहे. जेवण करायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अरबट-चरबट खाल्ले जाते शिवाय वेळेवर जेवणही केले जात नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या तक्रारी सुरु होतात.

HEALTH: Digestive function? So take 5 suites! | HEALTH : पचनक्रिया बिघडलीय? तर घ्या हे ५ सूप्स !

HEALTH : पचनक्रिया बिघडलीय? तर घ्या हे ५ सूप्स !

Next
ong>-Ravindra More

आज प्रत्येकाचे आयुष्य घाईचे झाले आहे. जेवण करायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अरबट-चरबट खाल्ले जाते शिवाय वेळेवर जेवणही केले जात नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या तक्रारी सुरु होतात. अशावेळी किमान औषधं घेण्यासाठी शरीरात उर्जा राहावी याकरिता नेमके काय खावे असा प्रश्न पडतो. म्हणूनच काही आहारतज्ज्ञांनी पचायला हलक्या आणि व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीनयुक्त काही सूप्सचे पर्याय सुचवले आहेत. मग पहा हे हेल्दी आणि टेस्टी पर्याय.



कॅरट अ‍ॅन्ड कोरिएन्डर सूप
गाजर वाफवून त्याची पेस्ट करा. त्यामध्ये कोवळ्या कोथींबीरीचे देठ, सेलेरीचे देठ, खिसलेले आलं मिसळा. हे सूप पिल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करते. रात्रीच्या जेवणाला हे सूप उत्तम पर्याय आहे.



लेमन अ‍ॅन्ड कोरिएन्डर सूप
तुमच्या आवडीच्या भाज्यांचे काप पाण्यात उकळा. त्यामध्ये मिरपूड, लवंग मिसळा. त्यासोबत कोथिंबीरीची पानं व लिंबाचा रस मिसळा. संध्याकाळच्या वेळेस हे सूप फायदेशीर आणि पोटभरीचे असते.



पालक पनीर सूप
तेलावर कांदा आणि लसूण परता. त्यावर पालकाची पेस्ट टाका. यामध्ये थोडं किसलेलं पनीर मिसळा. हे सारं मिश्रण एकत्र उकळा. यामध्ये अ‍ॅन्टीआॅक्सिडंट घटक अधिक असतात. जेवणात तुम्हांला पालक पनीर खाणं पसंत नसेल तर त्याला सूप प्रमाणे ट्विस्ट द्या. 



दालचिनीयुक्त टोमॅटो सूप
चिरलेला कांदा, टोमॅटो उकळत्या पाण्यात घाला. त्यामध्ये लसूण,अक्रोडाचे काप आणि भाज्या मिसळा. एक उकळी आल्यानंतर त्याचे एकत्र मिश्रण करा. त्यामध्ये मिरपूड आणि दालचिनीची पावडर मिसळा.  हे सूप पिण्याअगोदर एकदा गरम करू शकता.  हे सूप उत्तम अ‍ॅपॅटायझर आहे सोबतच पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 



लाल भोपळ्याचे सूप
 लाल भोपळ्याचे काप, कांदा, लाल मिरच्या, आलं,मसूण पेस्ट भाजलेलं जिरं दोन कप पाण्यात शिजवा. प्रेशर कूकरमध्ये १० मिनिटे हे मिश्रण शिजवल्यानंतर कूकर थंड होऊ द्या. सारे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पेस्ट करा. हे सूप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

Web Title: HEALTH: Digestive function? So take 5 suites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.