Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2017 10:02 AM2017-07-06T10:02:51+5:302017-07-06T17:52:01+5:30

जिमला न जाताही काही उपायांनी तसेच घरीच मेहनत करुन आणि डायटची काळजी घेऊन आपणही पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया या सिंपल टिप्स ज्या मसल्स बनवण्यात मदत करतील...

Health: Do not go to the gym at home; | Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !

Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !

googlenewsNext
ong>-Ravindra More
बॉलिवूड-हॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे पिळदार शरीर पाहून आजच्या यंगस्टर्सलादेखील त्यांच्यासारखे पिळदार शरीर हवे असते. बहुतेक सेलेब्स असे पिळदार शरीर मिळण्यासाठी रात्रंदिवस जिममध्ये मेहनत करतात. शिवाय डायटचीही तशीच काळजी घेतात. एवढी मेहनत घेण्याचा आजच्या तरुणाईला मात्र कंटाळा येतो. परंंतु जिमला न जाताही काही उपायांनी तसेच घरीच मेहनत करुन आणि डायटची काळजी घेऊन आपणही पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया या सिंपल टिप्स ज्या मसल्स बनवण्यात मदत करतील...

Image result for स्क्वैट्स

* स्क्वॅट्स
स्क्वॅट्समुळेही मसल्स स्ट्रॉँग होण्यास मदत होते. स्क्वॅट्स करताना सरळ उभे राहून दोन्ही हात सरळ रेषेत ठेवावे. त्यानंतर गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखे बसा. आता श्वास सोडून पुन्हा वर या. ही क्रिया किमान १० ते १५ वेळा करावी. 

Image result for नियमित वॉकिंग आणि रनिंग

 * नियमित वॉकिंग आणि रनिंग 
नियमित कमीत कमी ३० मिनिटे वॉकिंग आणि रनिंग केल्यास संपूर्ण शरीरातील मसल्स स्ट्रॉँग होण्यास मदत होते. 

Image result for * पुश-अप्स

* पुश-अप्स
पिळदार शरीरासाठी पुश-अप्स खूप फायदेशीर ठरतात. त्यासाठी अगोदर थोडेसे वार्म-अप करावे. त्यानंतर सरळ पोटावे झोपावे. झोपल्यानंतर दोन्ही हातांच्या आधारे शरीर वर घ्यावे. नंतर पुन्हा खाली घ्यावे. असे वर खाली किमान २५ ते ३० वेळेस करावे. 

Image result for * लेग ड्रॉप

* लेग ड्रॉप
लेग ड्रॉप करण्यासाठी पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही पाय हळुहळु वर उचलून सरळ करावे. या पोजिशनमध्ये थोडावेळ थांबावे. त्यानंतर पाय खाली घेऊन ४५ डिग्रीचा कोन बनवून पुन्हा थांबावे. असे ८ ते १० वेळा केल्याने मांसपेशी मजबूत होऊन शरीर पिळदार होण्यास मदत होते. 

Image result for * क्रंचेस

* क्रंचेस
मसल्स स्ट्रॉँग करण्यासाठी क्रचेस खूप महत्त्वपूर्ण आहे. कं्रचेस करताना जमिनीवर सरळ झोपावे. त्यानंतर दोन्ही हात कानाच्या मागे घ्यावे. आता पाय गुडघ्यापासून वाकवून डोके आणि पाठ वर उचलावे. पुन्हा त्याच पोजिशनमध्ये यावे. असे किमान २५ ते ३० वेळा करावे.

Related image

* साइड प्लॅँक 
साइड प्लॅँक करताना अगोदर एका कुशीवर झोपावे. त्यानंतर शरीराला एक हात आणि दोन्ही पायांच्या साह्याने वर उचलावे आणि ३० सेकंद वर ठेवावे. यादरम्यान पोट आणि मांड्या ताणून ठेवावे. असे किमान ८ ते १० वेळेस करावे.

* कात्री
यामुळेही शरीर पिळदार होते. कात्री करण्यासाठी पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचलावे. हळुहळु डावा पाय खाली घेऊन सरळ करावा. त्यानंतर उजवा पाय खाली घेऊन डावा पाय वर उचलावा. असे किमान ८ ते १० वेळेस करावे. 

Also Read : ​Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !

Web Title: Health: Do not go to the gym at home;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.