​Health : स्टार्सची ‘ही’ वाईट सवय आपणासही आहे का? सोडवा ‘योगा’ द्वारे !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 09:28 AM2017-09-16T09:28:12+5:302017-09-16T14:58:12+5:30

काही योगा तज्ज्ञांच्या मते, योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा लांब ठेवू शकतो, जाणून घ्या सविस्तर...!

Health: Do you have a bad habit of 'this' star? Resolve 'Yoga' by! | ​Health : स्टार्सची ‘ही’ वाईट सवय आपणासही आहे का? सोडवा ‘योगा’ द्वारे !

​Health : स्टार्सची ‘ही’ वाईट सवय आपणासही आहे का? सोडवा ‘योगा’ द्वारे !

Next
ong>-रवीन्द्र मोरे 
बहुतांश स्टार आपले फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. हेल्दी डाएट, व्यायाम हा त्यांच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यापासून ते स्वत:ला दूर करू शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अभिनेत्री तनुजा आपल्या स्मोकिंगच्या सवयीमुळे त्रासलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्या सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसुद्धा चेन स्मोकर्सपैकी एक आहे. स्मोकिंगच्या सवयीमुळे अनेकदा तो वादात अडकला आहे. काही वर्षांपूर्वी जयपूरमधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरूख स्टेडियममध्ये स्मोक करताना आढळला होता. शाहरूख खान, तनुजा यांच्याव्यतिरिक्त राणी मुखर्जीसह बऱ्याच स्टासंर्ना खासगी आयुष्यात सिगारेट ओढण्याची सवय आहे. 

या सेलिब्रिटींचेच अनुकरण करुन आजची तरुणाईदेखील धूम्रपानाला बळी पडली आहे, विशेषत: उच्च शिक्षण घेणारे तरुण या व्यसनाच्या जाळ्यात मोठ्याप्रमाणात अडकले आहेत. धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सवार्ना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. मात्र एका अध्ययनाद्वारे, योगाच्या माध्यमातून धूम्रपानाची सवय सोडविली जाऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे. काही योगा तज्ज्ञांच्या मते, योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा लांब ठेवू शकतो.

धूम्रपान सोडण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उपाय उपलब्ध आहेत. पण, धूम्रपान रोखण्यासाठी याचा वापर एवढा प्रभावशाली नाही. सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे शरीराला धोका असणारे पदार्थ शरीरात प्रवेश करून रक्त गोठायला सुरुवात होते. त्यामुळे याचा परिणाम हृदय आणि रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील आॅक्सिजन रक्तातील अभिसरण कमी करते. 

धूम्रपानच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वांगासन (शोल्डर स्टँड), सेतू बंधासन (ब्रिझ मुद्रा), भुजंगासन (कॉबरा पोझ), शिशुआसन (बाल पॉझ) या सर्व योगासनांमुळे स्मोकिंगपासून सुटका होण्यास मदत होते. धूम्रपानामुळे श्वसनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थांना लांब ठेवले जाते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवून आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.  

Also Read : ​​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !
                   : Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !

Web Title: Health: Do you have a bad habit of 'this' star? Resolve 'Yoga' by!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.