Health : ​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 01:13 PM2017-07-14T13:13:51+5:302017-07-14T18:43:51+5:30

पोहणे केवळ आनंद नसून शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे

Health: Do you know the benefits of 'swimming' swimming? | Health : ​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

Health : ​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

googlenewsNext
रत्येक सेलिब्रिटीला आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यांचे फिट शरीरच त्यांची खरी ओळख असते. त्यासाठी ते जिम, योगा, डायटबरोबरच पोहण्याकडेही विशेष लक्ष देतात. विशेष म्हणजे पोहणे हा त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भाग आहे. एका अभ्यासानूसार पोहणे केवळ आनंद नसून  शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. 

जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे 

* वजन नियंत्रित ठेवते - पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना तुमच्या शरीराचे सर्व स्नायू काम करतात. फक्त अर्धा तास पोहण्याने तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. 

* मन आनंदी राहते - यामुळे टेंशन व ताण नाहीसा होतो. पोहण्यामुळे आनंद निर्माण करणारे हॉर्मोन्स अधिक प्रमाणात स्त्रवतात. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. 

* दुखापतीचा धोका नाही - वर्कआऊट करताना दुखापत किंवा इजा होण्याची शक्यता असते. पोहताना ही शक्यता राहत नाही. पोहताना स्नायू व बंधांवर विशेष ताण येत नाही. 

* घाम येत नाही - पोहण्याचा उत्तम फायदा म्हणजे घाम न येता वर्कआऊट होते. वर्कआऊट करताना येणाºया घामाचा त्रास सहन करायचा नसेल तर तुम्ही पोहायला जायला हवे. पाण्यात राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो. 

* स्नायू बळकट होतात - पोहल्याने स्नायू बळकट होतात. पोहताना पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. वजनी साहित्याने वर्कआऊट करण्यापेक्षा मोकळेपणे पोहून आपले स्नायू तुम्ही बळकट बनवू शकता. 



Web Title: Health: Do you know the benefits of 'swimming' swimming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.