कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही करावा लागू शकतो गंभीर समस्यांचा सामना, तज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:26 PM2020-05-15T14:26:52+5:302020-05-15T14:37:37+5:30
कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना आयुष्यभर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल असा धक्कादायक खुलासा तज्ञांनी केला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा वाढत चालला आहे. कोणताही आजार झाल्यानंतर काही कालावधीनंतर रुग्णांची शारीरिक स्थिती नॉर्मल व्हायला सुरुवात होते. पण कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना आयुष्यभर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल असा धक्कादायक खुलासा ब्रिटनच्या तज्ञांनी केला आहे. त्यांच्यामते कोरोनाच्या संक्रमणातून बऱ्या झालेल्या रुग्णला या आयुष्यभर शारीरिक दुर्बलता, फुप्फुसाचे आजार, हृद्यरोग तसंच मेंदूच्या आजाारांना सामोरं जावं लागू शकतं. ब्रिटनच्या तज्ज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचं लक्षणं जाऊन पुन्हा येणं ही स्थिती उद्भवू शकते.
तज्ञांनी कोरोनाचा आजार हा सध्याच्या पिढीसाठी पोलियो प्रमाणे गंभीर असल्याचे सांगितले आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांचे उपचार करणारे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. निकोलस हार्ट यांनी दावा केला आहे की, पोलियोप्रमाणे कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. लक्षणं दिसल्यानंतर अनेक महिन्यांनंतर या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
लंडनमधील एक महिला कोरोनातून बरी झाल्यानंतर हृदयाच्या विकारांची शिकार झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवल्यामुळे ९ आठवड्यांनंतर ही महिला हृदयाच्या आजारांची शिकार झाली . या आजारात हृदयाच्या पेशींना सुज येते. शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्तप्रवाह होणं कठीण होऊन बसतं.
खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून, व्यायाम करून कार्डीयाक आजारांच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे या महिलेने सांगितले. पण पीसमेकरची सुद्धा आवश्यकता भासू शकते. सध्या मला श्वास घ्यायला तीव्र त्रास होत असून उलटी होणं, डोळ्यांना ब्लर दिसणं अशा शारिरीक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असंसुद्धा ही महिला म्हणाली.
(प्रभावी 'हेल्थ इंडिकेटर' आहे तुमचं नाक; नाकातील 'हे' बदल असू शकतात गंभीर आजारांची लक्षणं)
(युरिक अॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय)