HEALTH : आपणास माहित आहेत का दाढी ठेवण्याचे हे १० फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 07:02 AM2017-03-21T07:02:01+5:302017-03-21T12:41:51+5:30
बहुतांश पुरुष दाढी विशेषत: फॅशनसाठी ठेवतात, मात्र दाढी ठेवण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत हे शास्त्रीयदृट्या निष्पन्नही झाले आहे
पुरुष दाढी विशेषत: फॅशनसाठी ठेवत असतो, मात्र दाढी ठेवण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत हे शास्त्रीयदृट्या निष्पन्नही झाले आहे. दाढी ठेवल्याने त्वचेसंदर्भात अनेक समस्या दूर होऊ शकतात, असे स्किन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार दाढी ठेवण्याचे १० कोणते फायदे आहेत, हे जाणून घेऊ या.
१) टॅनिंग
दाढी ठेवल्याने अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते.
२) सॉफ्ट स्किन
वातावरण तसेच तेज हवेच्या झोतामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. मात्र दाढी ठेवल्याने हवेचा परिणाम स्किनवर होत नाही म्हणून स्किन सॉफ्ट राहण्यास मदत होते.
३) संक्रमण
दाढी ठेवल्याने ‘एयरबोर्न बॅक्टेरिया’ तोंडात जाऊ शकत नाही, त्यामुळे संक्रमणाची भीति राहत नाही शिवाय थंडीपासूनही बचाव होतो.
४) अॅलर्जी
दाढी ठेवल्याने शरीराचे तापमान मेंटेन राहते. यामुळे पॉलेन अॅलर्जी, सर्दी, अस्थमा या सारख्या आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
५) सुरकूत्या
दाढी ठेवल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर धुळ, मातीचा परिणाम जाणवत नाही, त्यामुळे त्वचा मुलायम राहते आणि सुरकूत्या पडत नाही.
६) स्किन कॅन्सर
बऱ्याच संशोधनात स्पष्ट झाले आहे की, सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून दाढीमुळे त्वचेचे संरक्षण होते त्यामुळे स्किन कॅन्सरसारख्या भयानक आजारावर नियंत्रण येते.
७) चेहऱ्याचा ग्लो वाढतो
दाढी वाढविल्याने चेहऱ्यावर धुळ, माती, सूर्याच्या किरणांचा परिणाम कमी होतो त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढण्यास मदत होते.
८) पिंपल्स
ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे, अशांना वारंवार दाढी करावी लागत असल्याने पिंपल्सला ब्लेड लागून रक्त येते शिवाय संक्रमणदेखील वाढते. दाढी ठेवल्याने ही समस्या येतच नाही.
९) तारुण्य
दाढीमुळे चेहऱ्याचे सेबेसियस ग्लॅँड्स कव्हर्ड होतात, ज्यामुळे त्वचा मुलायम ठेवणारे आॅइल निघते ज्यामुळे वाढते वय लपते आणि तारुण्य टिकण्यास मदत होते.
१०) मॉइश्चराइज
हवेच्या तेज झोतामुळे त्वचा कोरडी पडते मात्र दाढी ठेवल्याने स्किन नेहमी मॉइश्चराइज राहते.