​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 07:19 AM2017-09-09T07:19:20+5:302017-09-09T12:49:20+5:30

लग्न करण्याचे बरेच फायदे आहेत, जाणून घेऊया त्या फायद्यांऐवजी...

Health: Do you know the wonderful health benefits of getting married? | ​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

googlenewsNext
्याच्या युवा पिढीचा विचार केला तर ते फक्त प्रेमाच्या भानगडीत पडतील पण लग्नाचे बंधन त्यांना नको असते. मग मुलगा असो वा मुलगी, नेहमी आपल्या आई-वडिलांना लग्न न करण्याचे अनेक कारण सांगत असतात. कदाचित आपणास माहित नसेल पण लग्न करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधनानुसार आपणास जर हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदय विकारासारखी समस्येचा त्रास असेल तर लग्न केल्याने आपली ही समस्या दूर होऊ शकते. या व्यतिरिक्त लग्न करण्याचे अजून बरेच फायदे आहेत, जाणून घेऊया त्या फायद्यांऐवजी...  
 
ब्रिटेनमध्ये सुमारे १० लाख वयस्क लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार एक प्रेम करणारा पार्टनर आपल्या आपली काळजी खूप चांगल्यापद्धतीने घेण्यासाठी प्रेरित करीत असतो. त्यामुळे आपले आयुष्य वाढण्यास मदत होते. तसेच लग्न केल्याने ह्रदय विकाराचा धोका कमी होतो त्यामुळेही आयुष्य वाढण्यास मदत होते, असे ऐस्टन मेडिकल स्कूलचे डॉक्टर पॉल कार्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. 

हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशरने आपण त्रस्त असाल आणि जर आपले लग्न झालेले असेल तर आपली रिस्क कमी होते. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे अशा ५०, ६० आणि ७० च्या वयातील महिला आणि पुरुषांपेक्षा लग्न झालेल्यांची जीवंत राहण्याची शक्यता सुमारे १६ टक्के जास्त असते.   
लग्न केल्याने फक्त ह्रदय विकाराच्या समस्यांमध्येच फायदा मिळत नाही ती, तर ज्यांच्या आयुष्यात जास्त रिस्क आहे, त्यांनाही फायता होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.  
   

Web Title: Health: Do you know the wonderful health benefits of getting married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.