अलर्ट! AirPods च्या जास्त वापरामुळे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर होतो का?; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 03:02 PM2024-07-22T15:02:32+5:302024-07-22T15:06:17+5:30
आजकाल बहुतेक तरुण AirPods वापरतात. एअरपॉड्स किंवा त्यासारख्या काही गॅझेट्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात. पण या रेडिएशनमुळे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर होऊ शकतो का? या विषयावर जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही.
एअरपॉड्स बहुतेक लोकांसाठी एक महत्त्वाचं गॅझेट आहे. मोबाईलचा आवाज थेट कानापर्यंत पोहोचण्यासाठी लोक एअरपॉड्स वापरतात. हे एक वायरलेस गॅझेट आहे. आजकाल बहुतेक तरुण AirPods वापरतात. एअरपॉड्स किंवा त्यासारख्या काही गॅझेट्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात. पण या रेडिएशनमुळे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर होऊ शकतो का? या विषयावर जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही.
कधी कधी काही संशोधनात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सरचा धोका असल्याचं सांगितलं जाते तर कधी काही संशोधनात हे नाकारलं जातं. जर यामुळे नुकसान होत असेल तर ते मोठ्यांपेक्षा लहान मुलांचं जास्त नुकसान होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कॅन्सर, मेंदूशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्यांचा धोका असतो यात शंका नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या मते, स्मार्टफोन आणि वायरलेस उपकरणांमुळे कॅन्सर होऊ शकतो, परंतु अद्याप कोणताही थेट संबंध समोर आलेला नाही. TOI बातम्यांमध्ये, डॉ. गौरव मेदिकरी, एचसीजी कॅन्सर सेंटर, बंगळुरूचे प्रोग्राम डायरेक्टर म्हणतात की, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, एअरपॉड्समुळे ब्रेन ट्यूमर होतो याचा कोणताही पुरावा नाही.
कमी धोका आहे असं गृहीत धरून युजर्स ते वापरू शकतात. परंतु जर तुम्ही AirPods वापरताना काही मार्गदर्शक तत्त्व पाळली तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते जास्त चांगले राहील. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, ब्लूटूथ इअरफोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओफ्रिक्वेंसी वेव्स खूप कमी असतात. सेल फोन देखील कमी रेडिएशन उत्सर्जित करतात. त्यामुळे त्यातून धोका असला तरी तो अगदीच किरकोळ आहे.
रोम विद्यापीठाचा अभ्यास देखील एअरपॉड्स आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात कोणताही थेट संबंध दिसत नाही. फोर्टिस कनिंघम रोड, बंगळुरू येथील सीनियर कन्सल्टेंट न्यूरोसर्जन डॉ. गणेश व्ही यांनी सांगितलं की, एअरपॉड्सपासून ब्रेन ट्यूमरचा धोका असू शकतो किंवा नसू शकतो, परंतु जर तुम्ही एअरपॉड्सचा जास्त वापर केलात किंवा त्यांचा दीर्घकाळ वापर केला तर अनेक प्रकारचे समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टरांनी सांगितलं की जर तुम्ही एअरपॉड्सद्वारे 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकलात तर ते कानाच्या आतील बाजुला असलेल्या हेअप सेल्स डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे ऐकण्याची क्षमताही नष्ट होऊ शकते. त्याच वेळी, जर तुम्ही एअरपॉड्स व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर कानात संसर्ग होऊ शकतो. तसेच एअरपॉड्स कानात जास्त काळ ठेवल्याने एअरवॅक्स वाढू शकतं, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.