HEALTH : जेवणानंतर पोटात गॅस होतो ? डायटमध्ये करा हे ५ बदल !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 07:51 AM2017-04-11T07:51:51+5:302017-04-11T13:21:51+5:30

अनेकांना जेवणानंतर गॅसचा त्रास सतावतो. या ५ गोष्टींचा काही काळासाठी त्याग केल्यास आपणास नक्की फायदा मिळेल.

HEALTH: Does the stomach cause gas after meals? 5 changes in diet! | HEALTH : जेवणानंतर पोटात गॅस होतो ? डायटमध्ये करा हे ५ बदल !

HEALTH : जेवणानंतर पोटात गॅस होतो ? डायटमध्ये करा हे ५ बदल !

Next
ong>-Ravindra More
अनेकांना जेवणानंतर गॅसचा त्रास सतावतो. विशेष म्हणजे हा त्रास कोणत्याही वयात होतो. मात्र योग्यवेळी आपल्या डायटमधून या ५ गोष्टींचा काही काळासाठी त्याग केल्यास आपणास नक्की फायदा मिळेल. 

कोणत्या वस्तू वगळाल?
१) पत्ताकोबीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असल्याने गॅस अधिक  होतात. त्याऐवजी डायटमध्ये काकडीचा समावेश करावा.

२) लसूनमुळेही पोटात गॅस होत असल्याने त्याऐवजी अद्रकचा समावेश करावा.

३) कांद्याच्या अधिक सेवनानेही पोटात गॅस होतो. म्हणून गॅसचा त्रास होत असेल तेव्हा कांद्याऐवजी पुदीनाचा वापर करावा. 

४) गहूच्या चपातीमध्येही कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्याऐवजी ज्वारी किंवा ओट्सचा वापर करावा. 

५) बऱ्याचजणांना सॉफ्ट ड्रिंक्स घेण्याची सवय असते. मात्र यामुळे पोटात गॅस अधिक होतात. त्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. 

Web Title: HEALTH: Does the stomach cause gas after meals? 5 changes in diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.