Health : आपल्या मुलांनादेखील ‘ही’ घातक सवय आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 02:05 PM2017-06-08T14:05:04+5:302017-06-08T19:35:04+5:30
आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते.
Next
आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते. विशेषत: लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. आपण काय खातो, काय पितो याचे ते निरिक्षण करीत असतात. बऱ्याचदा आपण मुलांसमोर चहा पितो, तर चहा पिण्याची त्यांचीही इच्छा होते. ते हट्टदेखील करतात. या हट्टापोटी आपण त्यांना तो दिलाही जातो. मात्र चहा पिल्याने आपल्या मुलांच्या आरोग्यावर काय विपरित परिणाम होतो याबाबत आपणास माहित आहे का?
बऱ्याचदा आपण मुलांना चहामध्ये दूध टाकून देतो. आपणास असे वाटते की, त्यानिमित्ताने दूध तरी पितील. मात्र असे करणे अयोग्य आहे. चहामध्ये कितीही दूध टाकले तरी चहाचा अर्क मुलांच्या पोटात जातोच.
* मुलांच्या तब्बेतीवर होतो परिणाम
लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती यांचे शरीर पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. जर तुमच्या घरातील मुले फार चहा पित असतील तर त्याचा वाईट प्रभाव त्यांच्या मेंदूवर, नर्व्हस सिस्टीमवर होत असतो. शिवाय कमजोर हाडे, हाडांचे दुखणे यासारखे आजारही मुलांना होतात. म्हणून मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना चहा पिण्याची सवय न लावता दूध आणि इतर पोषक पेय द्या.
Also Read : Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?
: OMG : आपणही मुलांसमोर ‘किस’ करता का?