HEALTH : ​पोट सुटलयं, दालचिनीयुक्त चहा प्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 10:56 AM2017-02-16T10:56:53+5:302017-02-16T16:26:53+5:30

दालचिनी सेवन केल्याने मेटाबॉलिझमची काम करण्याची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते. दालचिनीच्या चहाने हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो.

HEALTH: Drink stomach, drink cinnamon tea! | HEALTH : ​पोट सुटलयं, दालचिनीयुक्त चहा प्या !

HEALTH : ​पोट सुटलयं, दालचिनीयुक्त चहा प्या !

googlenewsNext
लचिनी हा एक मसाल्यातील पदार्थ असून त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशिर आहे. आज बऱ्याचजणांना पोटाचा घेर वाढण्याची समस्या आहे. आपणासही अशी समस्या असेल तर दालचिनीयुक्त चहाचे सेवन करावे. दालचिनी सेवन केल्याने मेटाबॉलिझमची काम करण्याची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते. दालचिनीच्या चहाने हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो. या चहात कॅलरीज नसते ज्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळते.
दालचिनीयुक्त चहा बनविण्याची योग्य पद्धत  



साहित्य
१ लीटर पाणी, १ लहान दालचिनीची काडी किंवा ५ लहान चमचे दालचिनी पावडर, १/२ चमचा मध.

कृती
एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून मिश्रण मध्यम आचेवर पाच मिनिटासाठी राहू द्या. हा चहा गार होऊ द्या नंतर यात मध मिसळा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या.

कधी प्याल
दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा. आपण आपल्या आवडीप्रमाणे हा चहा गार किंवा गरम सेवन करू शकता.

Web Title: HEALTH: Drink stomach, drink cinnamon tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.