HEALTH : तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यदायी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 02:21 PM2017-02-11T14:21:37+5:302017-02-11T19:55:24+5:30

इतर धातूंपेक्षा तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजले जाते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात नियमित पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात

HEALTH: Drinking copper is healthy! | HEALTH : तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यदायी !

HEALTH : तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यदायी !

Next
ong>-Ravindra More

प्राचीन काळापासून धातूच्या भांड्यात जेवण करणे किंवा पाणी पिणे आरोग्यदायी मानण्यात आले आहे. त्यात इतर धातूंपेक्षा तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजले जाते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात  नियमित  पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात, ज्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

* तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसेच रोग पसरवणाºया जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं. 

* तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.

* तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

* अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरूवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.

* पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

* शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.

* अ‍ॅनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने फायदा होतो. हे पाणी लोह सहजरित्या शोषून घेतं. त्यामुळे अ‍ॅनिमिया असणाऱ्यासाठी हे पाणी पिणं आवश्यक आहे.

* तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड, तारुण्यापीटिका तसंच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते.

* तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारून पचनशक्ती वाढवतं. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

* तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरतं.

Web Title: HEALTH: Drinking copper is healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.