Health : मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोज एक अंडे पुरे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 08:51 AM2017-06-08T08:51:45+5:302017-06-08T14:21:45+5:30

रोज अंडी सेवन केल्याने मुलांची वाढ चांगली होते याचे कारण त्यात पोषक भरपूर प्रमाणात असतात.

Health: Eating an egg every day for the health of children! | Health : मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोज एक अंडे पुरे !

Health : मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोज एक अंडे पुरे !

Next
ड्यातील पोषक तत्त्वांमुळे मुलांनी रोज एक अंडे सेवन केल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकते, असे एका नव्या संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेतील सेंट लुईसच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लोका आयनोटी यांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, रोज अंडी सेवन केल्याने मुलांची वाढ चांगली होते याचे कारण त्यात पोषक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो. अंडी सेवन करणारी मुले व सेवन न करणारी मुले अशा दोन गटांत हा प्रयोग करण्यात आला असता अंडी खाणाऱ्या मुलांची प्रकृती जास्त सुधारलेली दिसली. 
संशोधकांच्या मते रोज अंडी सेवन केल्याने त्या त्या वयात शरीराची जेवढी वाढ होणे अपेक्षित असते ती घडून येते. त्यामुळे मुलांचे साखर खाण्याचे प्रमाणही कमी होते. अंडी हे अगदी गरिबांनासुद्धा परवडू शकेल असे अन्न आहे. मात्र ज्यांना अंड्याची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी अंडी खाणे टाळावे. मात्र विकसनशील जगातील मुलांसाठी अंडी हे पोषक अन्न आहे त्याचा परिणाम जगात ०.३९ इतका दिसला असला तरी या प्रयोगात तो ०.६३ होता त्यामुळे अंड्यांचा वापर अधिक प्रभावी ठरला आहे. 

Also Read : Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !

Web Title: Health: Eating an egg every day for the health of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.