​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 09:31 AM2017-02-15T09:31:57+5:302017-02-15T15:07:51+5:30

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

HEALTH: Eating stale rice is healthy! | ​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

Next
ण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. 

शिळा भात खाल्ल्याने फॅट्स वाढण्याचा भितीने अनेकजण दुसऱ्या दिवशी भाताचे सेवन करीत नाही. मात्र आसामच्या अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे जाहिर केले आहे. 

भाताला फर्मेट कसे करावे
रात्री उरलेला भात एका मातीच्या भांड्यात पाणी टाकून ठेवावा. याने भात फर्मेंट होईल. शिळा भात फर्मेंट केल्यास त्यातील लोहाचे प्रमाण सुमारे ७० टक्क्याने वाढते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाणही वाढते. सकाळी या भाताला फोडणी टाकून किंवा दह्यासोबत ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. 

काय आहेत फायदे 
शिळ्या भाताची तासीर गार असल्याने अधिक उष्णता असलेल्या राज्यांमध्ये फर्मेट केलेला भात खाल्ला जातो. याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तसेच यात ऊर्जा प्रदान करणारे तत्त्वदेखील आढळतात. ज्याने आपल्यात दिवसभर स्फूर्ती राहते. भातात भरपूर मात्रेत फायबर्स आढळतात ज्याने बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन यासारखे आजार तसेच अल्सरसंबंधी त्रासापासूनही मुक्ती मिळते.

 

Web Title: HEALTH: Eating stale rice is healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.