HEALTH : औषधोपचारानेही डोकदुखी बरी होत नाही? तर असू शकतात हे गंभीर आजार !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 07:28 AM2017-03-29T07:28:15+5:302017-03-29T12:58:15+5:30
जर आपणास नेहमी डोकदुखीची समस्या सतावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजार असू शकतात, जाणून घ्या कोणते असू शकतात ते आजार..
Next
डोकदुखीची समस्या तशी सामान्य आहे, मात्र बऱ्याचदा ही हानिकारकही ठरू शकते. जर आपणास नेहमी डोकदुखीची समस्या सतावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे ब्रेन ट्यूमर किंवा मायग्रेनचेही लक्षणे असू शकतात. यासाठी आपणास या लक्षणांविषयी जाणून घेणे खूपच आवश्यक आहे.
* जर आपण आपल्या शरीराचे बॅलेन्स करु शकत नसाल तर आपणास सावध व्हायला हवे. अशावेळी आपणास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण आहे. मुख्यत: ट्यूमर शरीराच्या पेशींना प्रभावित करतो ज्याने व्यक्ती चालताना तोल सांभाळू शकत नाही. सोबतच स्मृतिभ्रंश होणे, झटके येणे हेदेखील ब्रेन ट्यूमरचे लक्षणे आहेत.
* जर डोकेदुखी थांबतच नसेल तर मायग्रेनदेखील असू शकते. यात आपल्या डोक्याचा अर्धाभाग दुखत असतो आणि मळमळ होणे तसेच प्रकाश आणि गोंधळाने आपणास त्रास होणे आदी लक्षणे जाणवतात.
* डोळ्यांच्या चारही बाजूने किंवा डोळ्यांच्या वरच्या बाजूला खूप तिव्रतेने दुखत असेल तर याला सामान्य दुखणे समजू नका. हे क्लसटर डोकेदुखीचे लक्षण आहे. बहुतांश लोकांना या समस्येने ग्रासले आहे मात्र याचे परिणाम भयंकर असतात. यात बऱ्याचदा डोळे लाल होणे, डोळ्यातून, नाकातून पाणी गळणे आदी समस्या उद्भवतात.
* जर डोक्याच्या चारही बाजून दबावासारखे वाटत असेल आणि हे दुखणे एका आठवड्यापर्यंत असेल ही समस्या ताणतणावाने होऊ शकते. चिंता आणि तणाव या समस्येचे मुख्य कारण आहे. याशिवाय चेहऱ्याच्या मांसपेशींमध्ये समस्या असल्यानेही ही समस्या उद्भवते.
* जेव्हा डोके, नाक आणि चीकबोन्समध्ये सातत्याने दुखण्यासारखे वाटत असेल तर हे सायनस डोकेदुखीचे लक्षण आहे. यामुळे ताप येतो आणि चेहरा सूजतो.
* बऱ्याचदा लोकांना नेहमी थकवा, शरीराच्या एखाद्या भागात नेहमी दुखणे आदी समस्या असतात, ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. यासाठी ते पेनकिलर घेऊन झोपून जातात, मात्र हे लक्षण कित्येकदा हानिकारक ठरू शकते.