जास्त घाम येतोय?, 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता; जाणून घ्या, कारणं आणि लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:31 PM2024-08-07T16:31:11+5:302024-08-07T16:38:11+5:30

जेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त घाम येतो तेव्हा ती गंभीर चिंतेची बाब असू शकते. ज्याला हायपरहायड्रोसिस असंही म्हणतात.

health excessive sweating can be sign of vitamin d deficiency | जास्त घाम येतोय?, 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता; जाणून घ्या, कारणं आणि लक्षणं

जास्त घाम येतोय?, 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता; जाणून घ्या, कारणं आणि लक्षणं

घाम येणं ही नॅचरल प्रोसेस आहे. यामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त घाम येतो तेव्हा ती गंभीर चिंतेची बाब असू शकते. ज्याला हायपरहायड्रोसिस असंही म्हणतात. हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील होतं.

थकवा

व्हिटॅमिन डी आपल्या उर्जेची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपल्यानंतरही थकवा जाणवू शकतो.

स्नायू कमकुवत

स्नायू दुखू शकतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे दैनंदिन कामं अधिक आव्हानात्मक होऊ शकतात.

मूड स्विंग

व्हिटॅमिन डीला "सनशाईन व्हिटॅमिन" म्हणून देखील ओळखलं जातं कारण ते सेरोटोनिनचे उत्पादन करण्यास मदत करतं. म्हणजेच एक हार्मोन जो आपला मूड नियंत्रित करतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मूड बदलू शकतो किंवा डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकता.

हाडं दुखणं

व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण करण्यास मदत करते, जे निरोगी हाडांसाठी आवश्यक आहेत. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.

केस गळणं

केसांची वाढ आणि देखभाल करण्यात व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात किंवा पातळ होऊ शकतात.

Web Title: health excessive sweating can be sign of vitamin d deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.