'ही' आहे झोपण्याची सगळ्यात चुकीची पद्धत, रात्रभर लागणार नाही गाढ झोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:17 AM2024-10-10T11:17:40+5:302024-10-10T11:19:16+5:30
Sleeping Position : हेल्थ एक्सपर्ट आणि लेखक प्रशांत देसाई यांनी झोपण्याची चुकीची पद्धत आणि योग्य पद्धत याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Sleeping Position : दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा रात्री झोप घेतली जाते तेव्हा शरीराला सगळ्यात जास्त आराम मिळतो. झोपेदरम्यान मेंदू आणि शरीर रिपेअर होत असतं. या झोपेने शरीराला आणि मेंदुचा थकवा दूर होतो. रात्री जर चांगली झोप झाली तर सकाळी सुद्धा फ्रेश वाटतं. मात्र, अनेकांना रात्री झोपण्याची योग्य पोजिशन माहीत नसते.
जास्तीत जास्त लोक रात्री चुकीच्या पद्धतीने झोपतात. ज्यामुळे त्यांना चांगली झोप मिळत नाही आणि शरीर तणावात राहतं. हेल्थ एक्सपर्ट आणि लेखक प्रशांत देसाई यांनी झोपण्याची चुकीची पद्धत आणि योग्य पद्धत याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाठीवर झोपणं चुकीचं
एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा झोप न येण्याची समस्या असलेल्या लोकांवर रिसर्च करण्यात आला, तेव्हा याचं एक मुख्य कारण झोपण्याची चुकीची पोजिशन समोर आली. रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या लोकांना चांगली झोप मिळत नाही, त्यातील जास्तीत जास्त लोक पाठीवर झोपत होते. यामुळे रात्री अनेकदा झोपमोड होते. या लोकांना गाढ झोप लागत नाही.
घोरण्याचं कारण
जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता तेव्हा जबडा आणि गळ्याच्या मसल्सवर दबाव पडतो. त्यामुळे तुमच्या श्वासनलिकेवर दबाव पडतो. याच कारणाने तुम्ही घोरता. तसेच पाठीवर झोपणारे लोक घोरतात आणि त्यांना स्लीप एप्नियाची म्हणजे चांगली झोप न लागण्याची समस्या होते.
उशी सोबत घेऊन झोपण्याचे फायदे
ही समस्या दूर करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे उशी सोबत घेऊन झोपणे. याने तुमच्या मानेला आणि शरीराला आधार मिळतो. तसेच श्वासनलिका मोकळी राहते. याच कारणाने हॉस्पिटलमध्येही रूग्णांचा बेड थोडा वरच्या बाजूने केलेला असतो. जेणेकरून त्यांना चांगली झोप यावी.
झोपण्याची योग्य पद्धत
एक्सपर्टनुसार, जे लोक गाढ झोपतात ते साइड पोजिशनमध्ये झोपतात. डाव्या कडावर झोपा किंवा उजव्या कडावर झोपा याने श्वासनलिका मोकळी राहते.