Health : प्रसिद्ध अभिनेता टॉम अल्टर यांना झाला आहे ‘स्क्वामस सेल कार्सिनोमा’ कॅन्सर, काय आहे हा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 07:07 AM2017-09-12T07:07:02+5:302017-09-12T12:37:02+5:30
कोणत्या कारणाने हा कॅन्सर होतो आणि कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? जाणून घ्या !
Next
बॉलिवूड अभिनेता टॉम अल्टर यांना आपण सर्वजण ओळखतो. त्यांनी सत्यजित राय यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ मध्ये काम केले आहे. शिवाय ‘क्रांती’ मध्येही ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
आठवडाभरापूर्वी टॉम अल्टर यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नुकत्याच आलेल्या रिर्पोटनुसार त्यांना स्क्वामस सेल कार्सिनोमा हा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत झाला आहे.
* स्क्वामस सेल कार्सिनोमा (एस.एस.सी.) काय असतो?
या कॅन्सरला एपिडरमॉयड कॅन्सरदेखील म्हटले जाते, या स्क्वायमस सेलपासून बऱ्याच प्रकारचे कॅन्सर होतात. स्क्वामस सेल स्किन कॅन्सर जो स्किनवर परिणाम करतो, स्क्वामस सेल कार्सिनोमा जो फुफ्फुसावर परिणाम करतो तसेच स्क्वामस सेल थॉयराइड कार्सिनोमा जो थॉयराइडवर परिणाम करतो.
एस.एस.सी. शरीराच्या बच भागांमध्ये असतो ज्यात जेनेटेलिया आणि म्यूकस मेमब्रेनदेखील येतो. हा शरीराच्या ज्या भागांमध्ये होतो ज्याठिकाणी सूर्याची किरणे दुष्परिणाम करतात जसे डोके, कान, मान, पाठ आणि हाताचा मागचा भाग आदी. गेल्या वर्षभरापासून या कॅन्सरचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. या कॅन्सरपासून वाचणे फक्त एकच टक्के संभाव्य असते.
* स्क्वामस सेल कार्सिनोमा कोणत्या कारणांनी होतो?
विशेषत: सूर्य किरणांच्या संपर्कात आल्याने हा कॅन्सर होतो मात्र पिग्मेंटेशनच्या डिग्रीवर अवलंबून असते. शिवाय गोरे लोक जास्त वेळ सूर्य प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने टॅनिंग सॅलोनमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडियेशनचा प्रभाव होतो आणि हा कॅन्सर होऊ शकतो. केमिकल्स पदार्थांच्या जास्त संपर्कात राहणे जसे - टार, विषारी पाणी ज्यात आर्सेनिक, हर्बिसाइड, इंटेक्टिसाइड असते शिवाय तंबाखू आदी कारणांनीही हा कॅन्सर होतो. जळणे, क्रॉनिक अल्सर आणि एच.वी.बी. इन्फेक्शनच्या कारणानेही होतो. एस.एस.सी. होण्याचा धोका जास्त असतो मात्र अगोदरच पहिल्या स्टेजवर जर याचा उपाय करण्यात आला तर ठिक होण्याची सुमारे ९५ टक्के शक्यता असते. यासाठी ट्यूमरवर लक्ष द्यायला हवे.
Also Read: 'या' गंभीर आजाराशी लढा देतायेत टॉम ऑल्टर